शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 01:14 IST

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

उन्नाव : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळीकेला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने असे वातावरण निर्माण केले आहे की, राज्यातील गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही. भाजप सरकार असे म्हणत आहे की, उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना थारा नाही. मला तर असे वाटते की, त्यांनी जे उत्तर प्रदेश बनविले आहे त्यात महिलांसाठी जागा नाही.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबियांनी मला सांगितले की, कशाप्रकारे गुन्हेगारांनी या कुटुंबियाला त्रास दिला. पीडित कुटुंबाच्या मुलीला धमकी दिली गेली की, मुलीचे नाव शाळेतून काढून टाकले जाईल. त्यामुळे तिने शाळेत जाण्याची हिंमत केली नाही. मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. जूनमध्ये शेतातील पीक जाळून टाकण्यात आले. या कुटुंबाला सातत्याने त्रास दिला गेला.गुन्हेगारांना कुणाचाही धाक राहिलेला नाही

प्रियांका गांधी म्हणाल्या की, अशी चर्चा आहे की गावच्या प्रमुखाचे भाजपशी संबंध आहेत. या प्रकारामागील सत्य समोर आणण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. त्या म्हणाल्या की, अशा लोकांना संरक्षण दिले जाऊ शकते. असे प्रकार नेहमी होत आहेत.च्हे प्रकरण राजकीय न करता प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे की, अशा घटना सातत्याने का होत आहेत? आज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. एका टष्ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने पीडितेला सुरक्षा दिली नाही. गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली? असे अनेक सवाल त्यांनी केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण