शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे; सुधीर मुनगंटीवार यांचा आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 13:41 IST

लखनऊ:  बालपणापासून आपल्या पैश्यांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे प्रयावरणाचे रक्षण करणे हे देखील आपल्या संस्कारात ...

लखनऊ:  बालपणापासून आपल्या पैश्यांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे प्रयावरणाचे रक्षण करणे हे देखील आपल्या संस्कारात असायला हवे, असे प्रतिपादन करताना पर्यावरण रक्षणासाठी कुणाचा शोध घेत असाल तर एकदा आरश्यापुढे उभे राहा, तुमचा शोध संपून जाईल, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लखनऊ येथे आयोजित राष्ट्रीय जलवायू परिषदेत ते बोलत होते. लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेतील द्वितीय सत्र ‘पर्यावरण संवर्धनात विधिमंडळाची भूमिका' या विषयावर होते. यामध्ये सुधीर मुनगंटीवार प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले. 

पर्यावरणाच्या समस्येचे समाधान अमेरिका, ब्रिटन, जपान किंवा चीनला सापडणार नाही. 'वसुधैव कुटुम्बकम्' म्हणणाऱ्या भारतावरच हे समाधान शोधण्याची जबाबदारी आहे. आणि आज विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कर्मभूमी असलेल्या उत्तरप्रदेशातील या परिषदेत पर्यावरण बदल आणि ग्लोबल वॉर्मींगवरील उत्तर आपल्याला मिळणार आहे, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या दोन दिवसीय परिषदेत फक्त चिंतन करून चालणार नाही तर त्या चिंतनाचे  जनआंदोलनात रुपांतर करावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. हवामान बदलाचे मानवी जीवनावरील परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे गांभीर्याने प्रत्येकाने याची काळजी घ्यायलाच हवी, असे ते म्हणाले.

हक्क लक्षात राहिले, जबाबदारी विसरले

भारताचे संविधान अस्तित्वात आल्यापासून सर्वसामान्य माणूस असो, महापौर असो वा कुणी मंत्री असो, प्रत्येकाने संविधानात स्वतःचे अधिकार शोधले. आपल्याला असलेले अधिकार जाणून घेतले. पण याच संविधानात पर्यावरण, जलप्रदूषण, वन्यजीवसंवर्धन यासंदर्भात आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या आपण सोयीने विसरलो. फक्त हक्क लक्षात ठेवले. मनापासून भारत माता की जय असा नारा आपण लावत असाल तर संविधानातील जबाबदारी विसरू नका, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

वनविभागाचे महत्त्व जाणा

सरकारमध्ये वनमंत्री शेवटच्या पाचमध्ये मोजला जायचा. मी मंत्री झालो तेव्हा वनखात्याचे आणि वनमंत्र्यांचे महत्त्व समजावून सांगितले. कारण ज्या अॉक्सीजनच्या जोरावर इतर विभाग चालतात त्यांना ऑक्सिजन देण्याचं काम वने करतात. पर्यावरण रक्षणाचं काम वनखात्याच्याच माध्यमातून होतं, असे मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारचे वनखात्याचे बजेट २०१४ मध्ये २६५ कोटी रुपये होते, ते आज २ हजार ७०० कोटी रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले. मी वनमंत्री असताना महाराष्ट्रात ५० कोटी वृक्ष लागवड केली. कांदळवनाच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थसंकल्पात कांदळवनाच्या वृद्धीसाठी विशेष तरतूद केली, याचा अभिमान आहे, अश्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

जगात सर्वात जास्त वाघ भारतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशभरातील वाघांची संख्या सांगितली. यामध्ये जगातील एकूण वाघांपैकी ६५ टक्के वाघ भारतात असल्याचे ते म्हणाले. मला तर विशेष आनंद याचा आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कुठे असतील तर ते माझ्या जिल्ह्यात आहे. अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

राममंदिराची प्रतिकृती आणि श्रीरामाची मूर्ती भेट

राष्ट्रीय जलवायू परिषदेत सहभागी झाल्याबद्दल उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण मंत्री डॉ. अरुण कुमार सक्सेना यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती भेट दिली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण व विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी लखनऊ विमानतळावर सुधीर मुनगंटीवार यांचे श्रीरामाची मूर्ती देऊन स्वागत केले. तर राज्यमंत्री रवींद्र जायस्वाल यांच्यावतीने त्यांच्या मुलानेही श्रीरामाची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारenvironmentपर्यावरण