शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

अमेरिकेच्या धर्तीवर कामगारांचे पगार काही काळ सुरक्षित करा -चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 05:19 IST

कामगारांचे पगार काही महिन्यांसाठी सुरक्षित करण्याची अमेरिकेच्या धर्तीवर योजना केंद्र सरकारने तातडीने जाहीर करावी

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या ‘लॉकडाऊन’ने वाताहात झालेल्या खासगी उद्योगांमधील १२ कोटी कामगार देशोधडीला लागू नयेत यासाठी या कामगारांचे पगार काही महिन्यांसाठी सुरक्षित करण्याची अमेरिकेच्या धर्तीवर योजना केंद्र सरकारने तातडीने जाहीर करावी, असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी बुधवारी येथे केले.एका व्हिडिओ पत्रकार परिषदेत चिदम्बरम म्हणाले की, या अत्यंत कठीण काळात सरकारने मदतीचे स्पष्ट धोरण जाहीर केले नाही तर खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. तसे झाले तर कोट्यवधी कामगारांची रोजीरोटी बंद होईल.या कामगारांचे अप्रिल महिन्याचे पगार येत्या काही दिवसांत देय होणार आहेत. ते दिले जातील याची खात्री करण्यासाठी लघु, मध्यम व अन्य उद्योगांनाही आर्थिक मदत देण्याची योजना पंतप्रधानांनी तातडीने जाहीर करावी, अशी काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी असल्याचे ते म्हणाले.या संदर्भात त्यांनी अमेरिकेने जाहीर केलेल्या ‘पेचेक प्रोटेक्शन प्रोग्राम’चा (पीपीपी) दाखला दिला. अमेरिकेच्या संसदेने गेल्या महिन्यात ‘कोरोनाव्हायरस एड, रिलीफ अ‍ॅण्ड इकॉनॉमिक सेक्युरिटी’ (केअर्स) हा कायदा संमत केला. त्या कायद्यांतर्गत ३५० डॉलरची ‘पीपीपी’ योजना राबविण्यात येत आहे.त्यानुसार खासगी उद्योगांना कामगारांचे पगार व अन्य आवश्यक खर्च करणे शक्य व्हावे यासाठी सरकारकडून पुढील दोन महिने ठराविक मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याP. Chidambaramपी. चिदंबरम