शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुनींना संरक्षण द्या, जैन समाजाची मागणी; पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 09:56 IST

 देशाच्या इतिहासातील पहिलीच हृदयद्रावक घटना, जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको

बेळगाव/चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ जैन समाजबांधवांनी रविवारी बेळगावात सुवर्ण विधानसौधसमोर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दीड तासांहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन केले. जैन मुनी, स्वामीजींना संरक्षण देण्याची तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

जैन धर्माचे ध्वज हाती घेऊन आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत, जैन मुनींच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला. या क्रूर कृत्यात सहभागी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. या आंदोलनात सिद्धसेन महाराजांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजय पाटील, राजेंद्र जैन, अभय अवलक्की यांच्यासह श्वेतांबर व दिगंबर जैन समाजाच्या हजारो नागरिकांनी भाग घेतला. आंदोलनस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशाच्या इतिहासातील पहिलीच हृदयद्रावक घटना  कॅलिफोर्निया / नवी दिल्ली : जैन मुनी श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा आचार्य लोकेशजींसह समस्त जैन समाजाने तीव्र निषेध केला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर जैन आचार्य लोकेशजी यांनी कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींचा समावेश करून सखोल चौकशीची मागणी करणारे पत्र त्यांनी लिहिले आहे. त्यात आचार्य लोकेशजी यांनी म्हटले आहे की, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जैन मुनींच्या हत्येची पहिलीच दुःखद हृदयद्रावक घटना आहे. जैन मुनींची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूर व्यक्तीला योग्य ती शिक्षा मिळावी आणि संतांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. आचार्य लोकेशजी यांनी आपल्या मागणीसाठी अमेरिकेत उपोषण केले.