कोकण मंडळाकडून जमीन खरेदीचा प्रस्ताव
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
कोकण मंडळाकडून जमीन खरेदीचा प्रस्ताव
कोकण मंडळाकडून जमीन खरेदीचा प्रस्ताव
कोकण मंडळाकडून जमीन खरेदीचा प्रस्तावएमएमआर क्षेत्रातील २३ भूखंडांचा समावेशमुंबई :म्हाडा कोकण मंडळाने गृह प्रकल्प उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील २३ भूखंड खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून भूखंड खरेदीला परवानगी मिळाल्यास कोकण मंडळाला गृह प्रकल्पासाठी अतिरिक्त भूखंड उपलब्ध होणार आहेत.जमिनीअभावी सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नसल्याने कोकण मंडळाने मुंबई महानगर क्षेत्रात शासनाच्या विविद विभागाच्या जमीन खरेदीसाठी विशेष मोहिम राबविली होती. या माहिमेमध्ये मंडळाच्या अधिकार्यांनी भिवंडी, पनवेल, पेन, वसई आदी भागातील ५५ भूखंडाची पाहणी केली होती. यापैकी काही भूखंड रस्ते, पाणी आणि इतर सोयी सुविधांपासून कोसो दूर असल्याचेही आढळले होते. या ५५ भूखंडांमधून मंडळाने २३ भूखंड खरेदी करण्याचा प्रस्ताव शाासन दरबारी पाठविला आहे. या प्रस्तावांना मंजूरी मिळाल्यास कोकण मंडळाला अतिरिक्त भूखंड उपलब्ध होणार आहेत.