शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या वादावर ६ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:33 IST

अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद शांततेने सोडविण्यासाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार केलेला असेल, असे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने मंगळवारी म्हटले आहे

लखनौ : अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद शांततेने सोडविण्यासाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार केलेला असेल, असे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने मंगळवारी म्हटले आहे. बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले, यांनी आपण संत व महंतांना भेटण्यासाठी अयोध्येला भेट देणार आहोत. राम मंदिर त्या वादग्रस्त जागी उभारावे, असे मत रिझवी यांनी व्यक्त केलेले होते.अयोध्येचा वाद शांततेने आपापसात मिटावा, यासाठी मसुदा प्रस्तावावर मी आधीच त्यातील अनेकांशी आणि काही याचिकांकर्त्यांशी अटी आणि शर्तींबद्दल चर्चा केलेली आहे. आपापसातील सहमतीसाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार करू शकू, अशी आशा आहे, असे रिझवी म्हणाले. रिझवी यांनी गेल्या महिन्यात श्री श्री रविशंकर यांची बंगळुरूत भेट घेऊन राम मंदिराच्या जागेबद्दल वक्फ बोर्डची भूमिका सांगितली. वादग्रस्त जागी मशीद बांधली जाऊ नये, त्याऐवजी मुस्लीम लोकसंख्येच्या इतर ठिकाणी ती बांधावी, असे बोर्डला वाटते.अर्थात, त्या वादग्रस्त जागेशी शिया मुस्लिमांचा काडीमात्र संबंध नाही. ते ती जागा मंदिरासाठी देण्यास तयार कसे होतात, असे सुन्नी मुस्लिमांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिया वक्फ बोर्डाने काही म्हटले, तरी हा वाद सहजासहजी मिटण्याची शक्यता नाही.मी सरकारी हस्तक नाही-श्री श्री रविशंकरचंदीगड : अयोध्येतील रामजन्मभूमी वादातील मध्यस्थीत ‘सरकारचे हस्तक’ असल्याचा काँग्रेसने केलेला आरोप अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी फेटाळला. मी नेहमीच स्वत: काम केले आहे. मी कोणाच्याही सांगण्यावरून काम करीत नाही, असे ते सोमवारी वार्ताहरांशी येथे बोलताना म्हणाले. अयोध्या प्रश्नावर तुमची भूमिका काय, असे विचारले असता ते म्हणाले, मी जर एखादी भूमिका घेतली, तर मी मध्यस्थी कशी करू शकेन? संवाद साधून सर्व संबंधितांना एकत्र आणून तोडगा शोधता येईल का? याकडे मी बघेन. सरकारच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व रविशंकर करीत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी म्हटले होते. रामजन्मभूमीचा वाद न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी मध्यस्थीची तयारी रविशंकर यांनी दाखविल्याचे वृत्त होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर