शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांचा प्रचार ठरला आत्मघातकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:44 IST

राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली.

>दिलीप फडकेराहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली. आणि असे होणे मोदींच्या फायद्यात जाणारे होते.यावेळची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक मानावी लागेल. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी विजयश्री खेचून आणली आहे. मोदींवरच्या टीकेला मतदारांनीच तडाखेबंद उत्तर दिले आहे.शेतकरी, युवक यासारख्या समाजघटकांमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे निश्चित. जीएसटी, नोटाबंदी यासारखे प्रश्नही आहेतच. त्या प्रश्नांमुळे जनतेत नाराजीदेखील आहे; पण त्यामुळे विरोधकांची विश्वासार्हता आपोआप सिद्ध होत नाही. त्यामुळे या नाराजीचा निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही हे लक्षणीय आहे. असे कसे झाले हे समजावून घेतले तर या निवडणुकीचा खरा अन्वयार्थ समजावून घेता येईल. पाच वर्षांपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले तेव्हापासूनच मोदींचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट निर्माण झाले होते. पारंपरिक राजकारणाच्या चौकटीत विचार करणाºया अनेकांना मोदी हा फिनॉमिनन समजू शकलेला नाही असे मला वाटते. स्वत:चा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसणारा, दिवसाचे वीस तास काम करणारा आणि जागतिक स्तरावर नवीन असूनदेखील आपला ठसा जागतिक पटलावर उमटवणारा हा नेता जनसामान्यांना सुरुवातीपासूनच भावला आहे, हे पारंपरिक विचारांच्या लोकांना समजूच शकलेले नाही.निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असणाºया तंत्रात वाकबगार असणारे आणि त्यांच्या यशस्वितेसाठी लागणारे संघटनेचे भक्कम जाळे उभारण्याचे कौशल्य असणारे अमित शहांसारखे सहकारी मोदींकडे आहेत. त्यामुळे त्यांना विजय मिळवणे शक्य होते. पण आजच्या विजयाला मोदींप्रमाणेच विरोधी पक्षांची आत्मघातकी धोरणेदेखील तितकीच कारणीभूत आहेत हेदेखील नजरेआड करता येणार नाही. जी लवचीकता मोदी-शहा यांनी नितीशकुमार किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी युती कायम करताना दाखवली ती जर राहुल गांधी यांनी आम आदमी पार्टीशी किंवा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुजन विकास किंवा मनसेच्या संदर्भात दाखवली असती तर काही प्रमाणात चित्र वेगळे दिसले असते. केवळ लोकांसमोर स्टेजवर हातात हात घालून उभे राहण्याने निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी लागणारे सहकार्याचे वातावरण तयार होत नाही. त्यासाठी ते सहकार्य प्रत्यक्ष व्यवहारात दाखवावे लागते. राहुल आणि इतर विरोधी पक्षीयांनी वैयक्तिकरीत्या मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आणि त्यामुळे आपोआपच निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होत गेली. आणि साहजिकच हे असे होणे मोदींच्या फायद्यात जाणारे होते. तब्बल सात चरणांत प्रदीर्घ काळासाठी चालणाºया प्रचारात प्रसंगानुसार आपला संदेश बदलण्याची व्यूहरचना मोदींनी वापरली. त्यांच्यासमोर विरोधक अधिकाधिक हास्यास्पद होत गेले. बालाकोटच्या हल्ल्यानंतर या हल्ल्याच्या सत्यतेबद्दल निरर्थक शंका घेताना विरोधी पक्षीयांनी आपल्या बेवकूफपणाचे जे प्रदर्शन केले ते जनसामान्यांना चीड निर्माण करणारे ठरले. एकूणच जनतेच्या मनाचा अंदाज आपल्याच कल्पनांच्या जगात वावरणाºया उल्लूमशाल नेत्यांना आला नाही. मोदीविरोधाचे चश्मे लावलेल्या तथाकथित निष्पक्ष पत्रकारांनादेखील तो आला नाही. या निवडणुकीत मोदी नुसते जिंकलेच आहेत असे नाही, तर निर्णायक पद्धतीने त्यांनी विजय मिळवला. त्याचा अन्वयार्थ खूप विचारपूर्वक समजावून घ्यावा लागेल हे नक्की.(राजकीय विश्लेषक)