शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

आरोग्य सेवकांच्या पदोन्नत्या अडकल्या लालफितीत

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

सहा महिन्यांपासून होतोय फाईलींचा प्रवास

सहा महिन्यांपासून होतोय फाईलींचा प्रवास
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पदावर कार्यरत असलेल्या सुमारे २९ कर्मचार्‍यांना आरोग्य सहायक पदावर पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाची फाईल गेल्या सहा महिन्यांपासून फाईलींच्या प्रवासात अडकल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र दिनापर्यंत या पदोन्नत्यांची कार्यवाही न झाल्यास हे २९ आरोग्य सेवक आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेवकांनी पदोन्नतीची मागणी वारंवार करूनही आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे कर्मचारी सेवानिवृत्त झाले व काही होणार आहेत. काही अपेक्षेने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले आहेत. वारंवार चर्चा व बैठका होऊन ही पदोन्नतीची कार्यवाही होत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य विभागात रिक्त असलेल्या २९ आरोग्य सहायकांच्या पदांवर आरोग्य सेवकांना पदोन्नती देण्याची नस्ती परिपूर्ण प्रस्तावासह जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच आरोग्य विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयादरम्यान फाईलींच्या प्रवासात अडकली आहे. पात्र प्रत्येक आरोग्य सेवकाचा पदोन्नतीचा प्रस्ताव परिपूर्ण असूनही या ना त्या कारणाने ही पदोन्नतीची फाईल लालफितीत अडकली असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे या २९ आरोग्य सेवकांना पदोन्नती न दिल्यास १ मे महाराष्ट्र दिनापासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे संघटनेच्या अन्य मागण्यांमध्ये कालबद्ध पदोन्नती व स्थायित्व पदोन्नती, दुसर्‍या व चौथ्या शनिवारसाठी सार्वजनिक सुटी मिळावी, या मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)