शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेठी, रायबरेलीतील प्रकल्प बंद पाडले जातात

By admin | Updated: August 5, 2016 04:23 IST

लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला

नवी दिल्ली : सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला. तथापि, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात विजय मिळविला होता. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचे तर उपाध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. शुन्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे प्रमोद तिवारी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने या मतदारसंघांतील प्रकल्पांवर वरवंटा फिरविला जात आहे. यापूर्वी जगदीशपुर येथील हिंदुस्तान पेपर मील आणि डिस्कव्हरी पार्कला टाळे ठोकण्यात आले होते तसेच फुड पार्क प्रकल्पही रोखण्यात आला होता. आता राजीव गांधी इंडियन इन्स्टीट्यूट आॅफ इन्फॉर्मेशनची अमेठीतील शाखा बंद करण्यात आली आहे. राजकारणाचा हा किळसवाणा प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघातील प्रकल्प बंद करून तुम्ही त्यांना निवडून देणाऱ्या लोकांचा सूड घेत आहात, असे तिवारी म्हणाले. काँग्रेसमुक्त भारताची भाषा करणारा भाजप आता जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या संस्थाही बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप त्यांनी केला. तुम्ही कितीही प्रयत्न करा. मात्र, इतिहासातील त्यांच्या त्यागाचे संदर्भ तुम्ही वगळू शकणार नाहीत. इतिहास जेव्हा वाचला जाईल तेव्हा तुम्ही खलनायक म्हणूनच लोकांच्या समोर याल,असेही ते म्हणाले. तिवारी यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेसचे राजीव शुक्ला म्हणाले की, हे सरकार सुडाच्या भुमिकेतून काम करीत असल्याचे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोणीही सूडभावना ठेवू नये...विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या संख्येने प्रकल्प बंद करण्यात आले असतील तर असे का हा विचार आमच्या मनात डोकावणारच. सरकारला टोला लगावताना आझाद यांनी ‘चेटकीनीही काही घरे सोडतात’ ही म्हण उद्धृत केली. दोन पक्षांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, कोणीही सूडभावना ठेवू नये, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना नायडू म्हणाले की, कोणाचाही सूड घेण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो. फुड पार्क प्रकल्प संपुआ सरकारच्यात काळात बंद करण्यात आला. इतर प्रकल्पांचे मुद्दे मी संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना त्याची कारणे आणि पार्श्वभुमि विचारेन, असे ते म्हणाले.