शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Project Tiger: भारतात वाघांची संख्या 3 हजार पार, पंतप्रधान मोदींनी जाहीर केली नवीन आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 14:28 IST

आज प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी म्हैसूर येथील कार्यक्रमात वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली.

Counting Of Tiger: एक काळ होता, जेव्हा भारतात वाघांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी राहिली होती. पण, आज देशातील वाघांच्या संख्येने 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज(9 एप्रिल) देशातील वाघांच्या संख्येची नवीन आकडेवारी समोर आली आहे. टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर येथे एका कार्यक्रमात वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली. 

पीएम मोदी म्हणाले की, नव्या आकडेवारीनुसार 2022 च्या अखेरपर्यंत भारतात वाघांची संख्या 3167 झाली आहे. भारताने 5 दशकांपूर्वी 1 एप्रिल 1973 रोजी वाघ वाचवण्याची सर्वात मोठी मोहीम सुरू केली होती. प्रोजेक्ट टायगर असे त्याला नाव देण्यात आले. तेव्हापासून देशातील वाघांची संख्या सातत्याने वाढत असून आज जगातील 70 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. दरवर्षी ही लोकसंख्या 6 टक्क्यांनी वाढत आहे.

मोजणी कशी केली जाते?प्रकल्पाच्या सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्पांचा त्यात समावेश करण्यात आला होता. आज 50 वर्षांनंतर 53 व्याघ्र झाले आहेत. हे प्रकल्प 75,000 चौरस किमी क्षेत्र व्यापतात. एवढ्या मोठ्या परिसरात वाघांची गणना करणे सोपे काम नाही. 1973 मध्ये जेव्हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या पायाचे ठसे चिन्हांकित करण्यासाठी काच आणि बटर पेपर वापरत होते. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की माणसांप्रमाणेच प्रत्येक वाघाचे स्वतःचे वेगळे पाऊल ठसे असतात. वाघांचा मागोवा घेण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. रेंजर्स वाघाच्या पंजाचे ठसे शोधतात आणि भविष्यात त्या वाघाचा मागोवा घेण्यासाठी बटर पेपरवर त्याची नोंद ठेवतात. पण, हे काम इतके सोपे नाही. कारण, वाघाच्या उभ्या, विश्रांती घेताना आणि धावतानाच्या पायाच्या ठशांमध्ये फरक असतो. कालांतराने वाघ मोजण्याची नवीन पद्धत विकसित झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नमुने गोळा केले जातात, त्या आधारे वाघांच्या संख्येचा अंदाज लवकर लावला जातो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTigerवाघKarnatakकर्नाटक