शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा! शहांच्या शिष्टाईनंतर उपमुख्यमंत्री खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:35 IST

नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सन्मान्य खाते न दिल्यास मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिष्ठाई करून पटेल यांना पुन्हा वित्त खाते द्यायला लावले.

अहमदाबाद : नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सन्मान्य खाते न दिल्यास मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिष्ठाई करून पटेल यांना पुन्हा वित्त खाते द्यायला लावले. परिणामी गुजरातच्या भाजपा सरकारमध्ये गेले चार दिवस सुरु असलेल्या नाराजीनाट्यावर रविवारी पडदा पडला.अमित शहा यांनी सकाळी फोन करून माझ्या योग्यतेला व उपमुख्यमंत्र्याच्या दर्जाला साजेसे खाते देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असे पटेल यांनी पदभार स्वीकारायला जाण्याआधी निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. हा एखादे विशिष्ट खाते मिळण्याचा प्रश्न नाही तर माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, असे सांगून पटेल म्हणाले की, एक तर मला माझ्या इभ्रतीनुसार खाते द्या, नाही तर मला मंत्रिमंडळातून बाहेर पडू द्या, असे मी पक्षश्रेष्ठींना स्पष्टपणे कळविले होते.पटेल हे उपमुख्यमंत्री असल्याने वित्त खाते नसले तरी मंत्रिमंडळात त्यांचे स्थान दुसºया क्रमांकाचेच राहणार आहे. त्यामुळे त्यांनी नाराज होण्याचे काही कारण नाही, असे सांगणाºया मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची रविवारी भाषा बदलली. पटेल मेहसाणाला रवाना होताच रुपाणी यांनी वित्त खाते त्यांना देण्यात आल्याचे गांधीनगरमध्ये जाहीर केले. ‘नितीनभाईंना वित्त मंत्रालय देण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद आता संपला आहे. भाजपासारख्या मोठ्या पक्षात अशा छोट्या कुरबुरी होतच असतात. खातेबदल करण्याचे पत्र मी राज्यपालांना पाठविले आहे, असे रुपाणी म्हणाले.पटेल यांच्या नाराजीची संधी साधत त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी केला होता. नितीन पटेल १० आमदारांसह भाजपा सोडून येणार असतील तर, काँग्रेसशी बोलून त्यांना सन्मानाचे पद दिले जाईल, अशी आॅफर हार्दिक पटेल यांनी दिलीहोती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Nitin Patelनितीन पटेलGujaratगुजरात