शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

संभाव्य मुख्यमंत्र्यांचे प्रोजेक्शन असे बारगळले..!

By admin | Updated: July 16, 2014 23:27 IST

जागा वाढविण्यासाठी हमखास विजयी होऊ शकणाऱ्या भाजपाच्या काही आमदारांना तयार राहण्याचे संकेत शहा यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आधी जास्तीत जास्त आमदार निवडून आणा, मग दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवू असा चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजपाच्या कोअर समितीसह प्रमुख पदाधिकाऱ्याशी मंगळवारी शहा यांनी राज्याच्या स्थितीबद्दल चर्चा केली. मुख्यमंत्री पदाचे नाव तुर्तास बारगळल्याने, जागा वाढविण्यासाठी हमखास विजयी होऊ शकणाऱ्या भाजपाच्या काही आमदारांना तयार राहण्याचे संकेत शहा यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.राज्यात वातावरण मोदीमय असल्याने भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली तर पक्ष सत्तेत येऊ शकेल, ही प्रमुख शक्यता पडताळून पाहायची का, असे शहा यांना सांगण्यात आले. असे झाल्यास मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून लाभ घेता येईल, असेही त्यांना आडून सुचविले गेले. मात्र सत्तेत यायचे असेल तर या शक्यतांवर विचार करू नका, अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करा. ज्यांचे आमदार अधिक असतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल असे आधीच ठरल्याचे शहा यांनी सांगितले. त्यामुळे वाटाघाटीत जागा शिवसेनेच्या पदरात अधिक गेल्या तरी, विजयी किती होतील, यावरच मुख्यमंत्रीपदाचे नाव अवलंबून आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने ११९ जागा लढविल्या, पैकी ४७ जिंकल्या. शिवसेनेने १६० जागा लढविल्या, पैकी ४५ जिंकल्या. यावेळी भाजपा १२५-१३० जागा मागणार आहे. तर शिवसेनेला १६० जागांवरून १४५ जागांपर्यंत मागे आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. १७ ते २० जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठेवली जात आहे. पण शिवसेना जागा सोडेल का, याप्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेच नाही. प्रमोद महाजन असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेने बळकावला, तर गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बोलणी सुरू असताना गुहागर विधानसभा मतदारसंघ ओढून घेतला, त्यामुळे वाटाघाटीच्या यावेळच्या चर्चेत जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा नेते शिवसेनेवर उलटणारे अनेक मुद्दे भात्यात भरून नेणार आहेत. शहा यांना सांगण्यात आले, की शिवसेनाकडे ओढा असलेल्या रामदास आठवले यांना राज्यसभा बहाल करताना भाजपाने मदत केली, त्यामुळे राजू शेट्टी यांना भाजपा, तर आठवले व जानकर या मित्रांना शिवसेनेने आपल्या वाट्याच्या जागा द्याव्या, दोन्ही पक्ष ज्या जागा कधीच जिंकू शकले नाहीत, त्या जागांवर यावेळी भाजपाने दावा करावा. त्यामुळे जागांच्या वाटाघाटीत शिवसेना पुढे राहणार असली, तरी प्रत्यक्षात भाजपाचे उमेदवार जास्तीत जास्त विजयी करण्याचे धोरण असणार आहे.