शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको, सातपूर, नाशिकरोडला मिरवणूक

By admin | Updated: April 15, 2016 23:38 IST

सातपूर : स्वारबाबानगर येथून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या मंडळाचा चित्ररथ, राजवाडा मंडळाचा चित्ररथ, कोब्रा फ्रेंड सर्कल हे चित्ररथ सहभागी झाले होते. मिरवणुकीचा शुभारंभ सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंेडे, प्रभाग सभापती सविता काळे, मनपा स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मिरवणूक स्वारबाबानगर, राजवाडा, शिवाजी चौक, शिवाजी मंडईमार्गे काढण्यात आली होती. मिरवणुकीत हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते.

सातपूर : स्वारबाबानगर येथून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या मंडळाचा चित्ररथ, राजवाडा मंडळाचा चित्ररथ, कोब्रा फ्रेंड सर्कल हे चित्ररथ सहभागी झाले होते. मिरवणुकीचा शुभारंभ सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंेडे, प्रभाग सभापती सविता काळे, मनपा स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मिरवणूक स्वारबाबानगर, राजवाडा, शिवाजी चौक, शिवाजी मंडईमार्गे काढण्यात आली होती. मिरवणुकीत हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. सिडकोतही मिरवणूक सिडको परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा प्रारंभ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आला. ही मिरवणूक महाकाली चौक राजरत्न चौक, रायगड चौक, सावतानगर मार्गे, त्रिमूर्ती चौकात आली. मिरवणुकीत डीजेच्या तालावर आबालवृद्धांनी ठेका धरला होता. समितीचे अध्यक्ष संजय गांगुर्डे, संतोष सोनपसारे, सुनील जगताप, विनोद भडांगे, संजय भामरे, अनिल आठवले, दीपक मोकळ, सुमन जाधव आदि सहभागी झाले होते. सिडकोत १२ मंडळांनी मिरवणुका काढल्या. एकूण २३ मंडळांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. नाशिकरोडला जयजयकारडॉ. बाबासाहेेबांचा जयजयकार, फटाक्यांची आतषबाजी निळीची उधळण, लाडूचे वाटप, ढोलताश्यांचा गजरात नाशिकरोड परिसरात डॉ. आंबडकरांची जयंती उत्साहात पार पडली. नाशिकरोड पोलीस ठाणे येथे रात्री ८ वाजता सार्वजनिक उत्सव समिती व सुभाष रोड मित्रमंडळाच्या चित्ररथापुढे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत सिन्नर फाटा मित्रमंडळ, किरण मित्रमंडळ, सिद्धार्थ एकता मित्रमंडळ, संघमित्रा महिला मंडळ, भीमगर्जना मित्रमंडळ, भारत भूषण सोशल फाउंडेशन, धम्मरत्न मित्रमंडळ, त्रिशरण मित्रमंडळ आदिंसह ३५ चित्ररथ सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर बसपा, भाजपा, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, पिपल्स रिपाइं, रिपाइं गवई आदि पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चित्ररथांचे स्वागत केले. आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा येथे सार्वजनिक उत्सव समितीतर्फे चित्ररथ व आंबेडकर अनुयायांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.