शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या पावतीसाठी १६ लाख यंत्रांची खरेदी

By admin | Updated: April 20, 2017 00:57 IST

निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदानयंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित करून विरोधी पक्षांनी

नवी दिल्ली : निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदानयंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित करून विरोधी पक्षांनी रान उठविले असताना मतदानाची छापील पावती देण्याची सोय असलेली १६.१५ लाख मतदानयंत्रे खरेदी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.‘व्होटर व्हेरिफाएबल पेपर आॅडिट ट्रेल युनिट’ (व्हीव्हीपीएटी)ची सोय असलेली यंत्रे सप्टेंबर २०१८ पर्यंत उपलब्ध होतील. निवडणूक आयोगाने याआधी दोन टप्प्यांत मिळून अशी ५३,८०० यंत्रे खरेदी केली असून, आणखी ३३,५०० यंत्रांची मागणी नोंदविली आहे. अशा प्रकारे एकूण १७ लाख दोन हजार ३०० ‘व्हीव्हीपीएटी’ यंत्रे उपलब्ध होतील व सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अशी यंत्रे वापरणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.‘सध्याचे वातावरण’ पाहता अशी यंत्रे खरेदी करण्यासाठी लागणारा निधी लवकर मंजूर करावा, अशी विनंती करणारे पत्र मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी गेल्याच आठवड्यात लिहिले होते. या निर्णयानुसार बेंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन सरकारी कंपन्यांकडून १६ लाख १५ हजार ‘व्हीव्हीपीएटी’ यंत्रे आयोग येत्या दोन वर्षांत खरेदी करेल. प्रत्येकी १६, ५०० रुपये एवढ्या अपेक्षित किंमतीने ३,१७३ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. कंपन्यांशी वाटाघाटी करून नेमकी किंमत ठरविली जाईल.याखेरीज चालू वर्षात नेहमीची मतदानयंत्रे आणि ‘व्हीव्हीपीएटी’ यंत्रांची खरेदी करणे व आगामी वर्षातील खरेदीसाठी ४० टक्के अग्रिम रक्कम देण्यासाठी पुरवणी मागण्या/ सुधारित अंदाजाच्या माध्यमातून निवडणूक आयोगास १,६०० कोटी रुपये लगेच उपलब्ध करून देण्याचाही निर्णय झाला. मतदानप्रक्रिया अधिक पारदर्शी व्हावी व मतदारास खात्री व्हावी, यासाठी मतदानयंत्रांमध्ये अशी ‘व्हीव्हीपीएटी’ युनिटची सोय करण्याची कल्पना निवडणूक आयोगाने ४ आॅक्टोबर २०१० रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीत मांडण्यात आली.ही सूचना मान्य केल्यावर अशी यंत्र वापरण्यासाठी निवडणूक नियमावलीत आॅगस्ट २०१३ मध्ये सुधारणा केली गेली.सध्या हा विषय पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला असून ही सोय सर्व केंद्रांवर केव्हापर्यंत उपलब्ध करणार अशी विचारणा न्यायालयाने केली होती.सर्व मतदानयंत्रांमध्ये अशी सोय टप्प्याटप्प्याने केली जावी आणि त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारने निवडणूक आयोगास उपलब्ध करून द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या अपिलावर ८ आॅक्टोबर २०१३ रोजी दिला.‘व्हीव्हीपीएटी’ म्हणजे काय?

सर्व मतदानयंत्रांमध्ये अशी सोय टप्प्याटप्प्याने केली जावी आणि त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारने निवडणूक आयोगास उपलब्ध करून द्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या अपिलावर ८ आॅक्टोबर २०१३ रोजी दिला.त्यावर मतदाराचे नाव, मतदारयादीतील क्रमांक व त्याने मत दिलेल्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह असा तपशील असतो. ही छापील पावती यंत्रातील एका पारदर्शक खिडकीतून सात सेकंदांपर्यंत पाहता येते. ती पाहून मतदार आपण दिलेले मत योग्य प्रकारे नोंदले गेले आहे याची खात्री करू शकतो.७ सेकंदांनंतर ही मतदानाची पावती आपोआप कापली जाऊन यंत्रासोबत जोडलेल्या एका सीलबंद पेटीत जमा होते. नंतर अशा सर्व स्लीप पुढील सहा महिने किंवा संबंधित निवडणुकीचे प्रकरण हायकोर्टात गेले तर न्यायालयाच्या आदेशानुसार जपून ठेवल्या जातात.