शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकपालपदासाठी संभाव्य २० जणांत न्या. ए. के. सिकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 05:46 IST

कायद्यासाठी सरकारने काहीच केले नाही - कॉँग्रेस

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : लोकपालपदासाठी ज्यांच्या नावांचा विचार होऊ शकतो अशा २० जणांच्या यादीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि ख्यातनाम विधिज्ञ मुकुल रोहटगी यांचा समावेश असून तिची बैठक शुक्रवारी पहिला लोकपाल निवडण्यासाठी झाली. मात्र त्यात कोणताही निर्णय झाला नाही.या बैठकीस आपण जाणार नाही, असे काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आधीच जाहीर केले होते. लोकपालचा शोध समितीने २० नावांची यादी निवड समितीकडे विचारार्थ पाठवली. त्यात न्या. सिकरी यांचे नाव आहे. शोध समितीने माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. जे. एस. खेहार आणि टी. एस. ठाकूर यांच्या नावाची शिफारस केलेली नाही. तथापि, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि नागरी सेवेतील माजी अधिकाऱ्यांची अनेक नावे सुचवली आहेत.विरोधी पक्षांचा प्रतिनिधी बैठकीला गैरहजर राहिल्यास ही उच्चाधिकार निवड समिती काय करील हे स्पष्ट नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची लोकपाल शोध समिती सरकारने स्थापन केली होती. संसदेने डिसेंबर २०१३ मध्येच लोकपाल विधेयक संमत केले आणि नंतरच्या महिन्यात ते अधिसूचित केले. मात्र लोकसभेत विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे लोकपाल नियुक्तीबाबत काहीच झाले नाही. तथापि, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत विरोधी पक्ष नेता नसल्याचा सरकारचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला होता आणि ख्यातनाम विधिज्ञाची नियुक्ती करण्याचा लोकपाल समितीला आदेश दिला होता.लोकपाल समितीचे निमंत्रण खरगेंनी नाकारलेलोकपाल निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी केंद्र सरकारने पाठविलेले निमंत्रण लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा धुडकावले आहे. या समितीची बैठक शुक्रवारी झाली.समितीच्या बैठकीला विशेष निमंत्रित म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्याला बोलाविले जाते. त्याला लोकपालाची निवड करण्याच्या प्रक्रियेत काहीही अधिकार नसतात. हा एकप्रकारे विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तो हाणून पाडण्यासाठीच हे निमंत्रण नाकारल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.यासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वात जास्त जागा जिंकलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला लोकपाल निवड समितीत सामावून घेण्यासाठी लोकपाल कायद्यात दुरुस्ती करण्याकरिता केंद्र सरकारनेगेल्या पाच वर्षांत काहीही केलेले नाही.