शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानाच्या मुलीला व्हायचंय डॉक्टर; प्रियंका गांधींचं मदतीचं वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 10:22 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार आझाद शहीद झालेत. शहीद जवान आझाद यांची मुलगी ईशाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळेस प्रियंका गांधी यांनी ईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देशहीद जवानाच्या मुलीला प्रियंका गांधींनी दिली मदतीचे आश्वासनईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यास मदत करेन - प्रियंका गांधी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधीलपुलवामा दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार आझाद शहीद झालेत. शहीद जवान आझाद यांची मुलगी ईशाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला. यावेळेस प्रियंका गांधी यांनी ईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. उन्नावमधील काँग्रेसच्या माजी खासदार  अन्नू टंडन यांनी ईशाचा संपर्क प्रियंका गांधींसोबत संवाद घडवून आणण्यास मदत केली.  प्रियंका गांधींनी फोनवरुन ईशाला भविष्यात काय करायचे आहे? असे विचारले. त्यावर तिनं डॉक्टर  बनून जनतेची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर प्रियंका गांधींनी तिचे स्वप्न पूर्ण करण्यास पूर्ण मदतीचे आश्वासन दिले.

14 फेब्रुवारीच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीदपुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीर