शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

Unnao Rape Case: 'ती'च्या कुटुंबाचा वर्षभर छळ होतोय; मुख्यमंत्री कुणाच्या बाजूने आहेत?; प्रियंका गांधींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 15:28 IST

पीडित कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांमध्ये भीती उरली नसून ते खुलेआम फिरत आहे. पीडित मुलीच्या कुटुंबावर वर्षभरापासून अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. मात्र आरोपीचे कुटुंब भाजपशी निगडीत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.

शनिवारी प्रियंका गांधी यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांची उन्नाव येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाशी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीनंतर बाहेर आल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, पीडित कुटुंबाशी मी चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले असून, खूप वाईट घटना घडली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबावर वर्षभर अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली.  कुटुंबातील महिलांना धमकावल्याचा आरोप प्रियंका गांधीनी केला.

 कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली. अशा प्रकारे कुटुंबाचा छळ होत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी लावला. तर हे सर्व कसे घडत आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा. तसेच योगी सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे असेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर ट्विटर हैंडलवरून ट्वीट करत योगी सरकारवर टीका केली आहे. या दुःखाच्या घटनेत पीडितेच्या कुटूंबाला धीर देण्याची मी देवाकडे प्रार्थना करते. त्यांना न्याय न मिळणे हे आपल्या सर्वांचे अपयश आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आम्ही सर्व दोषी आहोत. मात्र हे सर्व उत्तर प्रदेशमधील पोकळ झालेली कायदा व सुव्यवस्था देखील दर्शवते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

आरोपीचे कुटुंब भाजपशी संबंधित

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी हा गावच्या प्रमुखांचा मुलगा आहे. असे म्हटले जात आहे की त्याचे कुटुंब भाजपशी जोडलेले आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले जात आहे का ? कारण या आधी सुद्धा असे झाले असल्याचे प्रियंका म्हणाल्या. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप तर होत नाही ना ? याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. आरोपींना कोणतेही भीती नसून ते पीडित कुटंबाला सतत धमकावत असल्याचे सुद्धा प्रियंका गांधी म्हणाल्या.