शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधींकडे आता उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:26 IST

संपूर्ण उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पश्चिम विभागाचे प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी यांना सांभाळण्यास सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने यासंदर्भात औपचारिक आदेश जारी करण्यात आलेला नाही. परंतु, बुधवारी अमेरिका भेटीवर रवाना होण्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी घेण्यास सांगितले.अलीकडेच राहुल गांधी यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. राहुल गांधी २२-२३ जुलै रोजी परतणार असून, त्यानंतरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल, असे समजते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गांधी परिवाराच्या नेतृत्वामुळे ११ कोटींहून अधिक मते मिळाली. प्रियांका गांधी यांच्या हाती काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा दिल्यास मताधार आणखी वाढू शकतो. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी राहण्यास स्पष्ट नकार दिल्याने प्रियांका यांच्यासारखी व्यक्तीच काँग्रेसचे पुनरुज्जीवन करू शकते, असे या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रियांका यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशची सूत्रे हाती घेत राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या बैठका घेतल्या आहेत.।अध्यक्षपदासाठीही प्रियांका यांच्या नावाची चर्चा ?राहुल गांधी यांच्या जागी अ. भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी यांची निवड केली जाईल, असा प्रसारमाध्यमांचा होरा आहे. गांधी कुटुंबातील सदस्यच काँग्रेसचे पुनरुज्जीवन करू शकते, असे अनेकांचे ठाम मत असल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक किंवा शैलजा यांच्यापैकी एकाची नियुक्ती करून तात्पुरती व्यवस्था केल्याने पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यात दिरंगाई होईल, असे काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना वाटते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी