शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात नेत्यांचे ड्रायव्हरच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष; प्रियंका करणार मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 17:25 IST

अनेक जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मोठ्या नेत्यांच्या ड्रायव्हरकडे सोपविण्यात आल्याचे वास्तव प्रियंका यांच्यासमोर आले आहे. वाराणसी विभागातील एका जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोठ्या नेत्याचा ड्रायव्हर असल्याचे प्रियंका यांना सांगण्यात आले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. उत्तर प्रदेशातकाँग्रेसला आपला पारंपरिक अमेठी मतदार संघ देखील वाचवता आला नाही. उत्तर प्रदेशची जबाबदारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. परंतु, त्यांना देखील उत्तर प्रदेशातील फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील प्रियंका गांधी अजुनही मिशन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे.

प्रियंका गांधी सध्या तरी उत्तर प्रदेशातून काढतापाय घेतील अशी शक्यता नाही. राज्यात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची प्रियंका यांनी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये बदल करण्यापूर्वी प्रियंका गांधी जिल्ह्यांचा दौरा करत असून विविध जिल्ह्यातील सचिवांच्या बैठका घेत आहेत.

दरम्यान अनेक जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मोठ्या नेत्यांच्या ड्रायव्हरकडे सोपविण्यात आल्याचे वास्तव प्रियंका यांच्यासमोर आले आहे. वाराणसी विभागातील एका जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोठ्या नेत्याचा ड्रायव्हर असल्याचे प्रियंका यांना सांगण्यात आले. त्यावेळी प्रियंका यांनी गोरखपूर विभागातील एका जिल्ह्यात देखील अशीच स्थिती असल्याचे म्हटले. तर फैजाबादमध्ये एका नेत्याने आपल्या शाळेतील शिक्षकालाच जिल्हाध्यक्षपद दिले आहे. प्रियंका गांधी यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा सचिवांसोबत आयोजित बैठकीत प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्ष संघटनेत केवळ नावापुरता बदल करायचा म्हणून पक्ष संघटन स्थानिक पातळीवर मजबूत करायचे आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रमाणिकपणे पक्षाचं काम करणाऱ्यांची नावे मागितली. अशाच लोकांना येणाऱ्या काळात पक्षाकडून चांगली जबाबदारी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.