शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी प्रियंका गांधींना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 18:29 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 1-  उत्तर प्रदेशमध्ये 2017ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी तयारीला लागले आहेत. काँग्रेस पक्षही उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सज्ज असून, पक्षाची होत असलेली पडझड रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर उभं ठाकलं आहे.
 काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्याबाबत गंभीर असून, त्यानुसारच रणनीती आखली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी याच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारही हव्यात, असा उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. राहुल गांधी यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. मात्र काँग्रेसमधील सूत्रांनुसार, 19 मेनंतर याबाबत अधिकृत घोषणा काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे. 
19 मे रोजी पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. याचदरम्यान  प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित झाल्या, तर निवडणुकीला वेगळा रंग चढणार आहे. मागच्या अनेक निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापासून काहीसं अंतर राखून होत्या. मात्र त्यांनी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय नोंदवला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस काय खेळी खेळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.