शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पुन्हा बंद झालं रेल्वे गाड्यांचं आरक्षण; 30 एप्रिलपर्यंत धावणार नाहीत 'या' ट्रेन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 17:04 IST

आयआरसीटीसीनं येत्या १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनचं आरक्षण बंद करण्यात आलं असून, रेल्वेला या संबंधी सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत.

नवी दिल्लीः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेन्सचं बुकिंग पुन्हा एकदा बंद करण्यात आलं आहे. आता या ट्रेनचं १ मे २०२०पासून पुढचं आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आयआरसीटीसीनं येत्या १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनचं आरक्षण बंद करण्यात आलं असून, रेल्वेला या संबंधी सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत.प्रवासी तिकीट बुक करत नाहीतरेल्वे अधिका-याच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊननंतर धावणाऱ्या ट्रेनचं आरक्षण उघडलल्यानंतर लोकप्रिय रेल्वे गाड्यांचं अनेकांनी आरक्षण केलं. पण खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनमध्ये बुकिंग खूप कमी होते. एका दिवसात दीड ते दोनशे प्रवाशांनी बुकिंग केलेलं असून, एवढ्या प्रवाशांसाठी संपूर्ण रेल्वे चालवणे अवघड आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 1 मेपासून बुकिंग खुले करण्यात आले आहे. आरक्षण रद्द झाल्यास परतावा दिला जाणारअधिकारी म्हणाले की, ज्यांनी तेजस एक्स्प्रेसमध्ये 15 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान आरक्षण केलं होतं, त्यांना परतावा देण्यात येईल.सर्व गाड्यांची सेवा २१ दिवसांसाठी खंडितपंतप्रधानांनी २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेने १३५२३ गाड्यांच्या सेवा २१ दिवसांसाठी स्थगित केल्या आहेत. यामुळे खासगी गाड्यांचे कामकाजही ठप्प झाले आहे.देशात IRCTC दोन खासगी गाड्या चालवतेसध्या आयआरसीटीसीही प्रायोगिक तत्त्वावर तेजस एक्स्प्रेस गाडी चालवते.  दिल्ली ते लखनौ आणि अहमदाबाद ते मुंबई या मार्गांवर IRCTCच्या खासगी तत्त्वावरील गाड्या धावतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRailway Passengerरेल्वे प्रवासी