शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात खासगी ट्रेनचे जाळे विणले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 06:49 IST

भारतीय रेल्वेचे खासगीकरण सुरू असून, देशभरातील वेगवेगळ्या मार्गावरील १५० एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत.

- कुलदीप घायवटभारतीय रेल्वेचे खासगीकरण सुरू असून, देशभरातील वेगवेगळ्या मार्गावरील १५० एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. मागील वर्षांत लखनऊ ते दिल्ली तेजस एक्स्प्रेस ही पहिली खासगी ट्रेन धावली, तर जानेवारी, २०२० मध्ये मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस ही दुसरी खासगी ट्रेन धावणार आहे.व्या वर्षात मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे, मुंबई-लखनऊ, मुंबई-नागपूर, नागपूर-पुणे, पुणे-पटना, मुंबई-वाराणसी या मार्गांवर अनेक खासगी एक्स्प्रेस रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने चालविण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या एक्स्प्रेसचे तिकीट दर इतर एक्स्प्रेसपेक्षा जास्त असेल.मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून पाच वेळा धावण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार वेळा धावते. पश्चिम रेल्वे प्रशासन ‘पर्यावरणस्नेही’ स्थानकांची निर्मिती करण्यावर भर देत आहे. नव्या वर्षात एकूण ३६ स्थानकांवर स्थानकाच्या ३० टक्के जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नव्या वर्षात डेक्कन क्वीनला एलएचबी कोचमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ-माथेरान मार्गिका खुली करण्यात येणार आहे.दुहेरीकरण, विद्युतीकरणावर भरनव्या वर्षात मध्य रेल्वेच्या नागपूर, पुणे, भुसावळ, सोलापूर या भागांतील रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, दुहेरीकरण करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसचे रूपांतर एलएचबी कोचमध्ये केले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या काम हाती घेतले जाणार आहे.भाडेवाढ : नव्या वर्षात प्रति किमी ५ पैसे ते ४० पैसे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. एसी, स्लीपर, जनरल, लोकलचे मासिक पास याच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.१,२०० नवे रेल्वे पादचारी पूलदेशभरातील रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी ६ हजार ९६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सिग्नल व इंटरलॉकिंग प्रणालीच्या सुधारणेसाठी १ हजार ७५० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. या आर्थिक वर्षात १ हजार २०० नवीन रेल्वे पादचारी पूल बांधले जाणार आहेत. यासाठी ६ हजार ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे