शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणाबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; जाणून घ्या संपूर्ण प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 07:48 IST

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशात दररोज १४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशात पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. याची दखल घेत गृहमंत्री अमित शहांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत माफक घट; सोमवारी दिवसभरात ५,२१० बाधितांची नोंदकेंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं टाकणार आहे. देशातील ५० वर्षांवरील व्यक्तींची संख्या २७ कोटींच्या घरात आहे. या व्यक्तींना लवकर लस मिळावी यासाठी केंद्र सरकार खासगी क्षेत्राची मदत घेणार आहे. ज्येष्ठांना कोरोनाचा अधिक धोका असल्यानं त्यांचं लसीकरण प्राधान्यानं पूर्ण केलं जाईल. खासगी क्षेत्राच्या मदतीमुळे कोरोना लसीकरणास गती येईल.चिंताजनक! आधीपेक्षा अधिक वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; बचावासाठी CDC नं सांगितला प्रभावी उपायकोरोना लसीकरणात खासगी क्षेत्राची भूमिका नेमकी काय असेल, त्याची सविस्तर माहिती पुढील काही दिवसांत उपलब्ध होईल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं तयार केलेल्या पथकाचे प्रमुख म्हणूनदेखील पॉल कार्यरत आहेत. सध्याच्या घडीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण सुरू आहे. त्यात खासगी क्षेत्राचा सहभाग आहे. दर १० हजार लसींच्या डोजपैकी २ हजार डोज खासगी कंपन्यांकडून दिले जात आहेत, असं पॉल यांनी सांगितलं....तर पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, एम्सचे संचालक रणदीप गुलेरियांनी व्यक्त केली भीतीलसीकरण अभियानाचा वेग वाढल्यावर त्यातील खासगी क्षेत्राचा सहभाग आणखी वाढेल. लसीकरण अभियानात खासगी क्षेत्राची मोठी भागिदारी गरजेची आहे. कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत लस पोहोचेल, अशी माहिती पॉल यांनी दिली. देशात सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन मेडिकल स्टाफलाच कोरोना लस दिली जात आहे.४० ते ५० टक्के लसीकरण एका उच्चपदस्थ सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील टप्प्यात दररोज ५० हजार लोकांचं लसीकरण करण्याची सरकारची योजना आहे. आतापर्यंत देशातल्या १.०७ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात ४० ते ५० टक्के लसीकरण खासगी क्षेत्राच्या माध्यमातून केलं जाईल. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्रानं राज्यांना केल्या आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस