शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मारहाण करत कैद्यांचा जेलवर ताबा

By admin | Updated: March 26, 2017 19:51 IST

कारागृहाच्या दुसऱ्या गेटमधून आत शिरण्यासाठी अधिकारी व पोलीस कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - उत्तर प्रदेशमधील अटॉप कारागृहात कैद्यांनी पोलिसांवर हल्ला करत चक्क जेलचा ताबा घेतला आहे. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावरही हल्ला चढवला होता. फतेहगड जिल्हा अटॉप कारागृहातील कैद्यांनी सकाळी 11 वाजेपासून सुरक्षा रक्षकांना ओलीस ठेऊन कारागृहावर ताबा मिळवला आहे. 
 
कैद्यांनी घातलेल्या हैदासात कारागृहातील बराकीचे नुकसान झाले आहे. कैद्यांनी बराकी पेटवून तर दिल्याच शिवाय कारागृहाच्या छतावर चढून दगडफेकही करत आहेत. त्यामुळे कारागृहातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे.  
 
कारागृहाच्या दुसऱ्या गेटमधून आत शिरण्यासाठी अधिकारी व पोलीस कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अतुल नावाच्या एका कैद्यामुळे हा हिंसाचार भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. कंबरदुखीमुळे हा कैदी रुग्णालयात दाखल होता. त्याला कालच डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज सकाळी त्याची बराकीमध्ये रवानगी करण्यात आली.
 
दरम्यान, त्याला बराकीत नेत असतानाच त्याने सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे लगेचच कारागृहाचा अलार्म वाजला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कारागृहात तैनात अधिकारी व कर्मचारी कैद्यांना शांतता राखण्याचं आवाहन करत होते मात्र त्याला न जुमानता अनेक कैदी बराकींच्या छतावर चढले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर अधिक हिंसक होत कैद्यांनी कारागृहातील चादरी, गाद्या पेटवून दिल्या. कैद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत असताना डोक्याला दगड लागून कारागृह अधीक्षक आर. के. वर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत.