शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातही छोटा राजनच्या जीवाला शकीलकडून धोका

By admin | Updated: May 2, 2016 01:57 IST

गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये इंडोनेशियाच्या बाली येथे अटक झाल्यानंतर भारतात आणण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याच्या जीवाला तिहार तुरुंगातही छोटा शकीलपासून

नवी दिल्ली : गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये इंडोनेशियाच्या बाली येथे अटक झाल्यानंतर भारतात आणण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याच्या जीवाला तिहार तुरुंगातही छोटा शकीलपासून धोका आहे आणि त्याला संपविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू सहकारी असलेला छोटा शकील याच्या मोबाईल फोनवरून तिहार तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एसएमएस पाठविले जात आहेत आणि त्यात छोटा राजनला संपविण्यात येणार असल्याची धमकी दिली जात आहे. राजनला मिळणाऱ्या या धमकीमुळे त्याला अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातही अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, असे या सूत्रांनी सांगितले.९७१५०४२६५१३८ या मोबाईल फोन नंबरवरून तिहारचे विधी अधिकारी सुनील गुप्ता यांना एसएमएस पाठविण्यात आला आहे. छोटा राजनला आता लवकरच संपविण्यात येईल, अशी धमकी त्यात दिलेली आहे. अशाचप्रकारचा एक फोन तिहार तुरुंगाच्या लँडलाईन फोनवर आला होता. या फोन आणि एसएमएसबद्दल दिल्ली पोलिसांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती या सूत्रांनी दिली.(वृत्तसंस्था)