शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात वटहुकमासंबंधित विधेयकांना अग्रक्रम

By admin | Updated: November 22, 2015 23:54 IST

आगामी संसद अधिवेशनात वटहुकमांचे कायद्यांत रूपांतर करणारी विधेयके अग्रक्रमाने मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर राहणार आहे.

नवी दिल्ली : आगामी संसद अधिवेशनात वटहुकमांचे कायद्यांत रूपांतर करणारी विधेयके अग्रक्रमाने मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर राहणार आहे.येत्या २६ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यादरम्यान चेक बाऊन्स प्रकरणांशी निपटण्यासाठीचे दी निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट (अमेंडमेंट) बिल २०१५, उच्च न्यायालयात वाणिज्यिक विभागांच्या गठणाचा मार्ग प्रशस्त कणारे ‘दी कमर्शियल डिव्हिजन अ‍ॅण्ड कमर्शियल अपिलिट डिव्हिजन आॅफ हायकोर्टस् अ‍ॅण्ड कमर्शियल बिल २०१५’ या दोन वटहुकमांचे कायद्यात रूपांतर करणारी दोन विधेयके अग्रक्रमाने मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर असेन. याशिवाय सलोखा समझोत्याद्वारे वाद वेगाने निकाली काढण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी आणले गेलेले ‘मध्यस्थता व सलोखा समझोता (दुरुस्ती) वटहुकूम २०१५’ मंजूर करण्याचेही सरकारचे प्रयत्न असतील.पावसाळी अधिवेशन गोंधळामुळे पाण्यात गेल्याने आता हिवाळी अधिवेशनात ही महत्त्वपूर्ण विधेयके पारित करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. तूर्तास कमी वादग्रस्त अशी विधेयके पारित करण्याचे सरकारचे डावपेच आहेत. महत्त्वपूर्ण जीएसटी विधेयक पारित करण्याचेही सरकारचे मनसुबे आहेत. यासंदर्भात काँग्रेसने काहीसे अनुकूल संकेत दिले आहेत. संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू येत्या मंगळवारी दोन्ही सभागृहांच्या रालोआ नेत्यांची भेट घेतील. यानंतर २५ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण विधेयकांवर सर्वसहमती मिळविण्याच्या प्रयत्नांतर्गत सर्वपक्षीय बैठक बोलवली जाईल.