शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्य, शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 04:28 IST

न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर सतत नऊ महिने बलात्कार करणा-या शाळेचा मुख्याध्यापक व एक शिक्षक यांना पोलिसांनी अटक केली.

- एस.पी. सिन्हा पाटणा : येथील न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर सतत नऊ महिने बलात्कार करणा-या शाळेचा मुख्याध्यापक व एक शिक्षक यांना पोलिसांनी अटक केली. या शाळेलाही पोलिसांनी टाळे ठोकले आहे. शाळेत आसपासचे ९० विद्यार्थी शिकत होते.मुलीचा गृहपाठ तपासण्याच्या व गुण वाढवून देण्याच्या नावाखाली अभिषेक या शिक्षकामार्फत शाळेचा मुख्याध्यापक अरविंद कुमार ऊर्फ राज सिंघानिया याने या मुलीला कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यानंतर तिला कार्यालयाशेजारी असलेल्या आपल्या केबिनमध्ये नेऊ न प्राचार्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचे छायाचित्रण अभिषेक या शिक्षकाने केले. त्यानंतर ती व्हिडिओ क्लिप व छायाचित्रे सर्वांना दाखविण्याची धमकी देऊ न प्राचार्याने व शिक्षकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.मुलीने हा प्रकार घाबरून घरच्यांनाही सांगितला नाही. एकेदिवशी तिला घरातच चक्कर आली आणि उलट्याही झाल्या. तिच्या वागण्यातही काही बदल झाल्याचे घरच्यांना जाणवले. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले, तेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. त्याविषयी डॉक्टर व पालकांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने घाबरतच हा सारा प्रकार सांगितला. त्याआधारे पालकांनी पोलीस ठाण्यात लगेच तक्रार केली. पोलिसांनी पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंदवून घेतला आणि प्राचार्य सिंघानिया व अभिषेक यांना अटक केली. पोलिसांनी शाळेची व प्राचार्याच्या कार्यालयाची तपासणी केली. तेव्हा कार्यालयाशेजारील त्याच्या केबिनमध्ये कॉट, टीव्ही, फ्रीज असल्याचे आणि तो अनेकदा तिथेच राहत असल्याचे उघड झाले.>मोबाईलमध्ये सापडली छायाचित्रेपोलिसांनी प्राचार्य व शिक्षक या दोघांचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत. त्या मोबाईलमध्ये या विद्यार्थिनीसोबत दोघांनी स्वत:ची काढलेली अनेक छायाचित्रेही आढळून आली आहेत.सिंघानियाचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी असून, त्याचे काही नातेवाईकही पोलीस दलात आहेत.