शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी घेतला स्वीय कर्मचार्‍यांचा निरोप

By admin | Updated: May 14, 2014 04:35 IST

डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात आपल्या स्वीय कर्मचार्‍यांचा जातीने निरोप घेतला व दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. दशकभराच्या सहवासाची ही सांगता भावपूर्ण होती.

नवी दिल्ली: येत्या काही दिवसांत पंतप्रधान पदावरून पायउतार होणार असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात आपल्या स्वीय कर्मचार्‍यांचा जातीने निरोप घेतला व दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. दशकभराच्या सहवासाची ही सांगता भावपूर्ण होती.सूत्रांनुसार पंतप्रधान कार्यालयातील ११० स्वीय कर्मचार्‍यांना व्यक्तिश: भेटून व हस्तांदोलन करून डॉ. सिंग यांनी प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.गेली सलग १० वर्षे पंतप्रधान असलेल्या डॉ. सिंग यांचे या स्वीय कर्मचार्‍यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. याखेरीज ज्यांचा पंतप्रधानांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही अशा पंतप्रधान कार्यालयातील इतर ४०० कर्मचार्‍यांनीही पीएमओच्या व्हरांड्यात एकत्र जमून मावळत्या पंतप्रधानांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर नवे सरकार अधिकारावर येण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखीली संपुआ-२ सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होईल. त्यानंतर ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील. राष्ट्रपती भवनातून परतल्यावर डॉ. सिंग राष्ट्राला उद्देशून भाषण करतील, असेही सूत्रांनी सांगितले.सूत्रांनुसार शनिवारी पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसाठी चहापान आयोजित करतील व नंतर रात्री राष्ट्रपती मावळत्या मंत्रिमंडळासाठी आयोजित भोजन समारंभाचे यजमानपद भूषवतील.दरम्यान, नव्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी पीएमओची रंगरंगोटी करून त्यास झकपक करण्यात येत आहे. बाहेरून दगडी बांधकाम असलेल्या या १०० वर्षांहून जुन्या इमारतीची अंतर्गत सजावट खास करून नव्याने करण्यात येत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)