शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

Narendra Modi Punjab: पंतप्रधानांचा ताफा पहिल्यांदा असा रोखला गेला; केंद्राने पंजाब सरकारला खुलासा मागितला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 06:56 IST

PM Modi News: मोदी यांची फिराेजपूर येथे जाहीरसभा हाेती. परंतु, खराब हवामानामुळे ती रद्द करण्यात आली. यामुळे त्यांनी हुसैनीवाला येथे असलेल्या शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरविले.

- सुरेश भुसारीलाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी अडविला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. यानंतर माेदी पंजाबचा दाैरा अर्धवट साेडून भटिंडा येथून विमानाने दिल्लीला रवाना झाले. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली असून सुरक्षा यंत्रणेतील गंभीर उल्लंघन व केलेल्या ढिसाळपणाबद्दल पंजाब सरकारला खुलासा मागितला आहे.

पंतप्रधान माेदी यांच्या हस्ते पंजाबमध्ये बुधवारी जवळपास ४२,७५० कोटी रूपयांच्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन हाेणार हाेते. या संदर्भात त्यांनी सकाळी ट्विटही केले. मोदी यांची फिराेजपूर येथे जाहीरसभा हाेती. परंतु, खराब हवामानामुळे ती रद्द करण्यात आली. यामुळे त्यांनी हुसैनीवाला येथे असलेल्या शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरविले. ही भेट हेलिकाॅप्टरने होणार हाेती. जवळपास १५ ते २० मिनिटे वाट पाहिल्यानंतर ही हवामान चांगले न झाल्याने हेलिकाॅप्टरने तेथे जाणे रद्द करावे लागले. यामुळे वाहनांनी हुसैनीवाला येथे जाण्याचे ठरविण्यात आले. 

सुरक्षेची चाेख व्यवस्था झाल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा हुसैनीवालाकडे रवाना झाला. याबद्दलची माहिती पंजाबचे पाेलीस महासंचालकांना सुद्धा हाेती. हुसैनीवाला शहीद स्मारक ३० किलाेमीटर अंतरावर असताना एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा पाेहाेचल्यानंतर अचानकपणे शेतकऱ्यांनी रस्ता अडविला. जवळपास १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडविण्यात आला. हुसैनीवाला येथे जाणे रद्द करून पंतप्रधानांचा ताफा भटिंडा येथे परत फिरला. भटिंडा येथून विमानाने पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले.पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये झालेल्या ढिसाळपणाची गंभीर दखल तत्काळ केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे.

मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला खेदफिरोजफूर दौरा अर्धवट सोडून पंतप्रधानांना परत जावे लागले याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी खेद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या जाण्याच्या मार्ग ऐनवेळी बदलण्यात आल्याबद्दल कोणतीही सूचना राज्य सरकारला मिळाली नव्हती, असे स्पष्ट करीत चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपाचा साफ इन्कार केला आहे.

जबाबदारी निश्चित कराकेंद्रीय गृहमंत्रालयाने निवेदन जारी करून पंतप्रधानांच्या सुरक्षामध्ये झालेले उल्लंघन, निष्काळजीपणा व ढिसाळपणाबद्दल अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश पंजाब सरकारला दिले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर निष्काळजीपणाबद्दल पंजाब सरकारने सविस्तर खुलासा करावा, असेही या निर्देशांकमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब