शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "चहा टपरी"चा होणार कायापालट

By admin | Updated: April 22, 2017 11:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे त्या स्टेशनसाठी तब्बल 8 कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 22 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या स्टेशनवर चहा विकायचे त्या स्टेशनचा लवकरच कायपालट होणार आहे. नरेंद्र मोदी आपल्या लहानपणी ज्या स्टेशनवर चहा विकायचे त्याचं नाव "वडनगर रेल्वे स्टेशन". वडनगर रेल्वे स्टेशनला एक नवं रुप देण्यासाठी सरकारकडून 8 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केली.
 
वडनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी जवळपास 8 कोटी रुपये स्वीकारण्यात आल्याचीही माहिती त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा "वडिलांसोबत वडनगर स्टेशनवर चहा विक्री केली", असा उल्लेख केला आहे.  ही पंतप्रधान मोदींची जन्मभूमीदेखील आहे. 
(उत्तर प्रदेशात साधूंच्या वेशात होऊ शकतो दहशतवादी हल्ला, अलर्ट जारी)
 
दरम्यान, प्रकल्पाच्या अन्य माहितीबाबत सांगताना अहमदाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दिनेश कुमार यांनी सांगितले की, मेहसाना जिल्ह्यातील परिसरासहीत वडनगरचा विकास करण्यासाठी जवळपास 100 कोटी रुपये एवढा खर्च येईल. वडनगर रेल्वे स्टेशनचा विकास वडनगर, मोधेरा आणि पाटण ही ठिकाणं विकसित करण्यातील प्रमुख कामांपैकी एक काम आहे. पर्यटन मंत्रालयानं स्टेशनचे रुप बदलण्यासाठी पर्यटन विभागाला आतापर्यंत 8 कोटी रुपये दिल्याचीही माहिती त्यांनी दिली. 
(दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ‘ऑपरेशन मुंब्रा’ हाच जालीम उपाय - उद्धव ठाकरे)
 
यावेळी, प्रवासी ट्रेनसहीत मालवाहतूक करणा-या ट्रेनचेही वेळापत्रक लागू करण्यावर विचार सुरू असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान सध्या मालवाहक ट्रेन  यांचे कोणतेही निश्चित असे वेळापत्रक आखलेले नसल्याने त्यांची सेवा कोणत्याही वेळात सुरू असते. आम्ही एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे, ज्यानुसार तीन ते चार ट्रेन वेळापत्रकानुसार चालतील. या प्रकल्पाच्या विश्लेषणानंतर आम्ही सर्व मालवाहक ट्रेन्ससाठी अशाचप्रकारची प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.