शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जीएसटीत दिलासा देण्याचे संकेत; ९ नोव्हेंबरला गुवाहाटीत होणार परिषदेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:50 IST

- हरीश गुप्तानवी दिल्ली : जीएसटीच्या सदोष अंमलबजावणीवरुन व्यापारी वर्गात वाढत असलेला असंतोष पाहता चिंतीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत की, त्यांचे सरकार व्यवसाय करण्यासाठी अधिक सोयीस्कर सुविधा देईल. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरूझालेल्या गुजरातमध्ये जीएसटीचा मुद्दा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनला आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग उद्योगातील कामगार, व्यापारी आणि ...

- हरीश गुप्तानवी दिल्ली : जीएसटीच्या सदोष अंमलबजावणीवरुन व्यापारी वर्गात वाढत असलेला असंतोष पाहता चिंतीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत की, त्यांचे सरकार व्यवसाय करण्यासाठी अधिक सोयीस्कर सुविधा देईल. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरूझालेल्या गुजरातमध्ये जीएसटीचा मुद्दा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनला आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग उद्योगातील कामगार, व्यापारी आणि अन्य लोकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार सद्या काम करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेची बैठक ९ व १० नोव्हेंबरला गुवाहाटीत होणार आहे.वस्त्रोद्योगावरील ५ टक्के जीएसटी परत घ्यावा, अशी मागणी व्यापारी करत असले तरी ते शक्य दिसत नाही. पण, काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे. वार्षिक १.५० कोटी रुपयांची उलाढालीची मर्यादा वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. ही मर्यादा ५ कोटी करण्याची मागणी आहे. सरकार ही मर्यादा २.५ कोटी रुपये करण्याच्या विचारात आहे. त्याचा अर्थ १.५० ते २.५० कोटींची उलाढाल असणारे एक निश्चित कर भरतील. गुजरातमधील लोकांच्या वेदना कमी करण्यासाठी जीएसटीत दिलासा देण्याचे संकेत मोदी यांनी दिले आहेत.मोदी यांनी हा शब्द दिला आहे की, जीएसटी परिषदेबाबत उपाययोजना करण्यावर विचार करेल. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, सरकार २८ ते १८ टक्क्यांच्या कराच्या दरात कपात करेल. विविध राज्यातील अर्थ मंत्र्यांच्या तीन वेगवेगळ्या समित्यांनी जीएसटी स्लॅबमध्ये कपातीची शिफारस केली होती. आता या समितीने अशी शिफारस केली आहे की, हे दर १२ टक्क्यांच्या आत असावेत. जीएसटी परिषद ही मागणी स्वीकारुन कराचे दर १८ टक्क्यांवरुन १२ टक्के करु शकते. जीएसटी परिषदेने गत महिन्यात व्यापाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी काही उपाययोजनांची घोषणा केली होती. उद्योग आणि व्यापाराला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.जीएसटीचे समर्थन करत मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेतील ही सर्वांत मोठी कर सुधारणा आहे. जीएसटीसोबत आम्ही एका आधुनिक कर व्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत. जी पारदर्शी, स्थिर आणि लोकांच्या हिताची आहे. विशेष म्हणजे, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, त्यांना जीएसटी समजत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी