शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचा प्रचारसभांचा सपाटा; काँग्रेसची एकही सभा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 08:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला होता.

 उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्र सरकारसाठी उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला होता.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने ८ जानेवारीला केली. त्यामुळे शनिवारपासून या पाचही राज्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमध्ये कोणत्याही विकासकामांची उद्घाटने वगैरे करता येत नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच सर्व उद्घाटने, प्रचारसभा वगैरेंचा सपाटा लावला होता.

१६ नोव्हेंबर ते २ जानेवारी या कालावधीत मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक भागात सभा घेतल्या. पूर्वांचलपासून पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत मोदींनी १४ प्रचारसभा घेतल्या. या सर्व प्रचारसभांमध्ये  माेदींनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन वा भूमिपूजन केले. ९ जानेवारी रोजी मोदींची मोठी जाहीर सभाही होती. आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा रद्द झाली. मोदींनी मेरठमधून प्रचाराला सुरुवात केली तेथूनच निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.

काँग्रेसच्या प्रियंका गांधी गेल्या वर्षभरापासून उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. मात्र, त्यांना या कालावधीत एकही मोठी सभा घेता आली नाही. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, ही मोहीम त्यांनी राबवली, तसेच प्रतिज्ञा यात्राही सुरू केली. मात्र, कोरोनामुळे त्यांनी या सर्व मोहिमा स्थगित केल्या.

समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी विजय यात्रा काढली. मात्र, एकही मोठी जाहीर सभा त्यांना घेता आली नाही. अखिलेश यांनी २५ हून अधिक ठिकाणी यात्रा काढली. त्यांना चांगला प्रतिसादही लाभला. सर्व उत्तर प्रदेशात त्यांनी प्रचार केला.

राहुल गांधी यांनी तर एकही सभा घेतलेली नाही. बसपच्या मायावती मागे राहिल्या. त्यांना एकही सभा घेता आली नाही.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी