शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
4
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
5
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
6
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
7
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
8
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
9
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
10
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
11
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
12
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
13
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
14
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
15
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
16
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
17
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
18
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
19
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
20
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

आज देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे; PM मोदी १ लाखाहून अधिक तरुणांना देणार नियुक्तीपत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 08:52 IST

Rozgar Mela : देशातील ४७ ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे.

Rozgar Mela: नवी दिल्ली : देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या १ लाखाहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकात्मिक संकुल कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करतील. हे कॅम्पस मिशन कर्मयोगीच्या विविध स्तरांमधील सहकार्य आणि समन्वयाला प्रोत्साहन देईल.

अलीकडेच, पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे १ लाखाहून अधिक नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. देशातील ४७ ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. तसेच, या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारांना संबोधित देखील करणार आहेत.  

निवेदनात पुढे म्हटले आहे की, रोजगार मेळावा हे देशातील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एक पाऊल आहे. या मेळ्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणे आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि विकासात सहभागासाठी संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

'या' विभागांमध्ये नियुक्तीमहसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य मंत्रालय, कुटुंब कल्याण, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यासारख्या इतर अनेक मंत्रालये आणि विभागांमध्ये या नवीन भरती करण्यात आल्या आहेत.

८८० हून अधिक ई-लर्निंग कोर्स उपलब्धनव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आयजीओटी कर्मयोगी पोर्टलवर 'कर्मयोगी प्रारंभ' या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधीही मिळत आहे. विविध सरकारी विभागांमध्ये सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी हा ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स आहे. पोर्टलवर कर्मयोगी प्रारंभमध्ये शिकण्यासाठी ८८० हून अधिक ई-लर्निंग कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी