शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 07:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-2 चं सॉफ्ट लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात आले होते.

बंगळुरू - भारतीय चांद्रयान-2 चे विक्रम हे लँडर शनिवारी (7 सप्टेंबर) पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात होते. मात्र याच दरम्यान ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-2 चं सॉफ्ट लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान इस्रोच्या नियंत्रण कक्षात आले होते. त्यावेळी 60 पेक्षा जास्त विद्यार्थी नियंत्रण कक्षात होते. 

आज नियोजित कार्यक्रमानुसार सर्व गोष्टी यशस्वी झाल्या असत्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 वाजता देशाला संबोधित करणार होते. मात्र त्यानंतर आता इस्रोच्या नियंत्रण सेंटरमधून सकाळी 8 वाजता मोदी देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. इस्रो लँडर उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, संपर्क तुटल्यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांचे चेहरे पडले, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या... त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वाक्याने देशाला पुन्हा नवी उमेद मिळाली आहे.

होप फॉर द बेस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे एक वाक्य इस्रोतील वैज्ञानिकांना आणि 130 कोटी भारतीयांना नवी ऊर्जा देणारं ठरलंय. चांद्रयान 2 मोहिमेतील शेवटचा टप्पा असलेल्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर प्रत्येक भारतीयाची निराशा झाली होती. त्यावेळी, देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि देशवासियांचे मनोधैर्य वाढवले. चंद्रापासून केवळ 2 किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं. 

होप फॉर द बेस्ट... असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मी पाहिलंय, जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण, तुम्ही जे केलंय ते खूप मोठं काम आहे. तुम्ही देशाची, विज्ञानाची आणि मानवजातीची सेवा केली. मी तुमच्या पाठिशी असून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असे मोदींनी म्हटले. मोदींचे एक मिनिटांचे ते भाषण देशावासियांना नवी ऊर्जा देऊन गेलंय. त्यानंतर, मोदींनी ट्विट करुनही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे. हा क्षण अतिशय धाडसाचा आणि धैर्याचा आहे. आपण ते धैर्य ठेऊच,  इस्रोचे चेअरमन चांद्रयान 2 मोहिमेबद्दल माहिती देत असून आपण मोहिमेच्या चांगल्या पहाटेची आशा ठेऊया, असे ट्विट मोदींनी केलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2