शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

CoronaVirus News : कोरोनावर मात करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत नरेंद्र मोदींनी सांगितला पंचसूत्री कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 18:54 IST

PM Modi High level Meeting on Coronavirus : या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देकोव्हिड -19 (Covid-19) व्यवस्थापनासाठी लोकसहभाग आणि जनआंदोलन सुरू ठेवण्याची गरज आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक (PM Modi High level Meeting on Coronavirus) बोलावली होती. या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. (prime minister narendra modi is taking a high level meeting now to review the covid 19 related issues and vaccination) 

कोरोना स्थितीबद्दल चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, कोरोनावर मात करण्यासाठी समुदाय जागरूकता आणि याचा सहभाग सर्वोपरी आहे. कोव्हिड -19 (Covid-19) व्यवस्थापनासाठी लोकसहभाग आणि जनआंदोलन सुरू ठेवण्याची गरज आहे.

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना 5 सूत्री कार्यक्रम सांगितला आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोव्हिड नियमांचे पालन आणि लसीकरण जर संपूर्ण प्रामाणिकपणाने आणि बांधिलकीने राबविले गेले, तर या महामारीचा प्रसार थांबविण्यात प्रभावी ठरू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम कोरोनापासून बचाव करण्यासाठी 6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये लोकांना 100 टक्के मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी / कामाच्या ठिकाणी स्वच्छता किती महत्त्वाची आहे याबद्दल माहिती दिली जाईल.

(Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा)

देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ!भारतात रविवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 93,249 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. हा नोंद यावर्षी एकाच दिवसात झालेली कोरोनाची सर्वाधिक आहे. तसेच, देशातील संक्रमणाची एकूण संख्या 1,24,85,509 झाली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 19 सप्टेंबरनंतर कोरोनाची लागण होण्याची ही सर्वाधिक नोंद आहे. 19 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 93,337 रुग्ण आढळले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे 513 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,64,623 इतकी झाली आहे.

(Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद?, नक्की जाणून घ्या!)

देशातील आठ राज्यांमध्ये झपाट्याने वाढ!महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी या आठ राज्यातील रुग्णांची संख्या 81.42 टक्के इतकी आहे. तर सर्वाधिक रुग्णासंख्या असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बंगळुरू, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दहा जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे हे महाराष्ट्रातील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस