शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक! लाल किल्ल्यावरून ४०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण; मोदींकडून पोस्टाचे तिकीटही जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 23:02 IST

भारतानं कधीही कोणत्या देशासाठी किंवा समाजासाठी धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी लाल किल्ल्यावरून ४०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केलं. याशिवाय त्यांनी शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त (Guru Tegh Bahadur Parkash Purab) टपाल तिकिटही जारी केलं. “आज मला गुरूंना समर्पित स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्याचं भाग्य लाभलं आहे आणि याला मी गुरूंची माझ्यावर असलेली कृपा मानतो,” असं मोदी यावेळी म्हणाले.

“आज आपला देश संपूर्ण निष्ठेने आपल्या गुरुंच्या आदर्शांवर पुढे जात आहे. या पुण्यदिनी मी सर्व गुरूंना नमन करतो. तसंच सर्व देशवासीयांना आणि संपूर्ण जगातील गुरूवाणीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मी प्रकाश पर्वाबद्दल अभिनंदन करतो,” असं मोदी यावेळी म्हणाले. ही भारतभूमी केवळ एक देश नाही नाही तर मोठा वारसा आणि परंपरा आहे. याला हे आपल्या ऋषीमुनींनी, गुरूंनी शेकडो हजारो वर्षांच्या तपश्चर्येने आणि त्यांच्या विचारांना समृद्ध केले आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

“भारतानं कधीही कोणत्या देशासाठी किंवा समाजासाठी धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाची प्रगती हे ध्येय समोर ठेवतो,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नवीन विचार, सतत मेहनत आणि समर्पण ही आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हाच देशाचा हा संकल्प आहे. आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा. आपल्याला स्थानिक गोष्टींवर अभिमान असायला हवा आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला निर्माण करायचा असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.सूर्यास्तानंतर भाषणसूयास्तानंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच किल्ल्यावरुन मुघल शासक औरंगजेबने १६७५ मध्ये शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांचे शीर कापण्याचे आदेश दिले होते. म्हणूनच, तेज बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी लाल किल्ल्याचे ठिकाण नियोजित करण्यात आले होते. लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन देशाचे पंतप्रधान केवळ स्वातंत्र्यदिनीच देशाला संबोधित करत असतात. मात्र, त्यानंतर पुन्हा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्यात येत नाही. स्वातंत्र्यदिनानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानांनी या ऐतिहासिक स्थळावरुन भाषण दिलं.

दरम्यान, यापूर्वी मोदींनी २०१८ मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा ७५ वा स्थापना दिवस साजरा केला होता. त्यावेळी, लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. तर, सकाळी ९ वाजता त्यांनी भाषण केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाdelhiदिल्ली