शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौभाग्य योजनेचं केलं अनावरण, आता गरिबांना मोफत वीजजोडणी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 20:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यासाठी सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सौभाग्य योजनेंतर्गत 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचवण्यात येणार आहे. प्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देण्यात येणार असून, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन पुरविणार आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही. सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदू आहे. एक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. 9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येय आहे. देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आले आहेत. आज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्त आहे. काही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होती, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाही. देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केले. सौभाग्य योजनेचा देशातील अडीच कोटी लोकांना फायदा होणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्देदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आलेकाही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होतीआज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्तदेशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केलेप्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देणार, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन देणार2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाहीहर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज देणारगरिबांना मोफत वीज कनेक्शन, सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणारस्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदूगरिबांचं कल्याण ही सरकारची ओळखएक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येयदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी