शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

PM मोदींनी ब‍िल गेट्स यांना सांगितलं आपल्या जॅकेटचं 'राज'! कशापासून होतं तयार? तुम्हीही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 13:27 IST

यावेळी बिल गेट्स यांनी टेक्नॉलॉजीचा वेगाने अवलंब करण्याबरोबरच नेतृत्व क्षमतेबद्दलही भारतीयांचे कौतुक केले. तसेच, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेट्स यांना नमो ॲपवरील फोटो बूथचा वापर करून सेल्फी घेण्यास प्रोत्साहित केले.

पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी फ्री-व्हीलिंग चॅटमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा केली. यात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सपासून डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांपर्यंत अनेक गोष्टींचा सामावेश होता. यावेळी बिल गेट्स यांनी टेक्नॉलॉजीचा वेगाने अवलंब करण्याबरोबरच नेतृत्व क्षमतेबद्दलही भारतीयांचे कौतुक केले. तसेच, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेट्स यांना नमो ॲपवरील फोटो बूथचा वापर करून सेल्फी घेण्यास प्रोत्साहित केले.

बिल गेट्स यांच्या सोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, COP26 शिखर परिषदेत घोषित करण्यात आलेल्या 'पंचामृत' प्रतिज्ञांसह भारताच्या महत्त्वाकांक्षी हवामान बदलासंदर्भातील वचनबद्धतेसंदर्भातही भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मरेंद्र मोदी यांनी, र‍िसायक‍ल करून तयार करण्यात आलेल्या आपल्या जॅकेटसंदर्भातही बिल गेट्स यांना महिती दिली. ते म्हणाले, हे जॅकेट टिकाऊ पद्धतीने आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सांगितले की टेलर जे कपडे कापतो, त्यांनंतर जो कपडा उरतो, त्या कपड्यापासून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे.

मोदी म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीदरम्यान आम्ही मागे राहिलो. कारण आम्ही एक वसाहत होतो. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत डिजिटल घटक आमचा गाभा आहे. मला विश्वास आहे की, याचा भारताला प्रचंड फायदा होईल. यात एआयची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मी कधी कधी गमतीत म्हणत असतो, आमच्या देशात 'मां'ला ‘आई’ म्हणून संबोधले जाते. आता मी म्हणतो की, जेव्हा मूल जन्माला येते, तेव्हा ते आपला पहिला शब्द ‘ऐ’ देखील बोलते आणि ‘एआई’ही बोलते, कारण मुलं एवढी प्रगत झाली आहेत.

एआयच्या वापरासंदर्भातरीह भाष्य -पीएम मोदी यांनी देशातील एआयच्या वापरासंदर्भातरीह भाष्य केले ते म्हणाले. "मी भाषेच्या वापरासाठी जी20 शिखर सम्मेलनादरम्यान एआयचा वापर केला. आपल्या सर्व ड्रायव्हर्सनी जी20 समिटदरम्यान एक एआय अ‍ॅप डाउनलोड केले होते. या अ‍ॅपचा वापर ते समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या विविध परदेशी पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी करत होते. 

आपल्या नमो अ‍ॅपवर AI च्या वापरासंदर्भात बिलगेट्स यांना माहिती देनाता, पंतप्रधान मोदी यांनी बिल गेट्स यांना नमो अ‍ॅपच्या माध्यमाने सेल्फी घेण्यास सांगितले. यानंतर पीएम मोदींसोबतचे बिलगेट्स यांचे सर्व जुने फोटो मोबाइलवर दिसू लागले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBill Gatesबिल गेटसprime ministerपंतप्रधान