शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर निर्माणाची तारीख विचारणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दाखवला घरचा रस्ता; शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 06:56 IST

रामजन्मभूमीवर मंदिर निर्माणाची तारीख विचारणाऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी घरचा रस्ता दाखवला, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अयोध्या :

रामजन्मभूमीवर मंदिर निर्माणाची तारीख विचारणाऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी घरचा रस्ता दाखवला, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत आहे.

आपल्या पक्षाची व भाजपची विचारधारा एकच असून २०२४ च्या निवडणुकीत राज्यभर भगवा फडकेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती आहे. आम्ही अयोध्येतून नवी ऊर्जा घेऊन राज्यात जाऊ आणि जनतेची सेवा करू. २०२४ मध्ये शिवसेना आणि भाजपचा ‘भगवा’ संपूर्ण राज्यात फडकवला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

शरयूकिनारी केली महाआरती अयोध्येतील रामकथा हेलिपॅडवर उतरलेल्या शिंदे यांनी आधी रामलल्ला आणि नंतर हनुमानगढीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह होते. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे तलवार देऊन तर उपमुख्यमंत्र्यांना गदा भेट देऊन स्वागत केले. काही जणांनी मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाची भेटही दिली. सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी इतर नेत्यांसह शरयू किनारी महाआरती केली.  

शिंदे काय म्हणाले? कोण रावण ते तुम्हीच सांगा...“रावणराज आहे, असे म्हणणाऱ्यांना सांगेन की, हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांना त्यांनी तुरुंगात टाकले. ते रावण आहेत की राम आहेत, मला सांगा?”आता साधूंची हत्या होणार नाही...मे २०२० साधूंची हत्या झाली तेव्हा ते शांत बसले होते, पण आमच्या सरकारमध्ये साधूंची हत्या होणार नाही, त्यांचे रक्षण केले जाईल. ...मूर्तीसाठी अयोध्येची माती नेणार आम्ही अमरावतीला अयोध्येची माती नेऊ आणि तिथे बजरंगबलीचा १११ फुटांचा पुतळा बसवू. हीदेखील आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.  राममंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातून सागवान लाकूड येत आहे. अनेकांना हिंदुत्वाची ॲलर्जी अलिककडे काही लोकांना हिंदुत्वाची ॲलर्जी झालेली आहे, कारण ते देशातील प्रत्येक घराघरात पोहोचले तर त्यांचे दुकान बंद होईल. अयोध्या हा शिवसेना आणि भाजपसाठी राजकीय मुद्दा नाही, हा आमच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAyodhyaअयोध्या