शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राफेल घोटाळा दडपण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 05:09 IST

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेल सौद्यातील घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज खंगाळत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेल सौद्यातील घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज खंगाळत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जो कोणी राफेल घोटाळा प्रकरणाला हात घालील त्याला हटविण्यात येईल, संपविण्यात येईल, असाच स्पष्ट संदेश पंतप्रधानांच्या वर्मा यांच्यावरील कारवाईतून मिळतो. देश आणि संविधान धोक्यात आहे, असा भीतीवजा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.राजस्थानमध्ये निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला चढविला. सीबीआयमध्ये जे काही घडत आहे, ते केवळ राफेल घोटाळ्याचे बिंग फुटू नये म्हणून होत आहे. याला पंतप्रधान मोदी हेच जबाबदार आहेत, असा परखड आरोपही त्यांनी केला. राफेल घोटाळा उघड होऊ नये, यासाठी चौकीदाराने आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांसमवेत हे केले आहे. आलोक वर्मा यांनी राफेल सौद्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी हा सगळा खटाटोप ‘राफेलो फोबिया’ असल्याचे म्हटले आहे. यापासून बचाव करण्यासाठी मोदी व पंतप्रधान कार्यालय सीबीआयच्या कारभारात ढवळाढवळ करून संपवू पाहत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मंगळवारी रात्री हा निर्णय घेतला जात होता तेव्हा समितीचे सदस्य उपस्थित होते का? व जर नसतील तर हा निर्णय का घेतला गेला?, असा सवालही त्यांनी केला.रणदीप सुरजेवाला यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करून म्हणाले की, मोदी-शहा या जोडीने सीबीआयचे स्थान व महत्त्वच संपवून टाकले आहे. मोदीजी तुम्ही राफेल तपासाला का भिता?, असा सवालही त्यांनी केला.>सीव्हीसीचा होतोय दुरुपयोगसीव्हीसीला कळसूत्री बाहुल्या बनवून त्याचा दुरुपयोग केला जात आहे. सीबीआयच्या संचालकांना काढण्याचा अधिकार सीव्हीसीकडे नसल्याचे सिंघवी कायदा दाखवत सांगितले.पंतप्रधान व सीव्हीसी याचे उघड उल्लंघन करीत आहेत. त्यांनी याला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानले. कारण सर्वोच्च न्यायालयाने १९९८ मध्ये विनीत नारायणप्रकरणी सीबीआयला स्पष्ट दिशा निर्देश दिले होते. कलम ८ अंतर्गत सीबीआयच्या संचालकांची बदली किंवा कोणताही इतर निर्णय घेण्याचा अधिकार त्यावेळी ज्या समितीकडे आहे, जिच्याकडे त्यांच्या नियुक्तीचा अधिकारआहे.या समितीमध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा त्यांचा प्रतिनिधी किंवा लोकसभेतील सगळ्यात मोठ्या पक्षाच्या नेत्याचा समावेश केला गेला आहे. ही समितीच संचालकांची नियुक्ती करते व त्यांच्या दुसºया प्रकरणांवर निर्णय घेऊ शकेल.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधी