शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आईला मुखाग्नी देताच पंतप्रधान पुन्हा कार्यरत; ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दाखवला हिरवा झेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 06:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांच्या अंत्यसंस्कारानंतर सुमारे दोन तासांतच आपले दु:ख दूर सारून निर्धारित कार्यक्रमांना व्हर्च्युअली हजेरी लावली.

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी  आई हीराबेन यांना मुखाग्नी देत आई गेल्याचा शोक आवरत पुन्हा जनतेच्या सेवेसाठी कार्यरत झाले. मोदी यांनी शुक्रवारी हावडा ते न्यू जलपायगुडी या पश्चिम बंगालमधील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. 

प. बंगालसाठी चार रेल्वे प्रकल्पांचा प्रारंभ आणि न्यू जलपाईगुडी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी करणाऱ्या पंतप्रधानांनी न्यू जलपाईगुडीसह रेल्वेस्थानकांचा विमानतळांच्या धर्तीवर विकास केला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.  पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग म्हणून सुमारे १२० कोटी रुपये खर्चून हुगळी नदीखाली बांधला जाणारा भारतातील पहिला बोगदा प्रवाशांना ४५ सेकंदांचा थरारक अनुभव देतो. या बोगद्याचा ५२० मीटरचा पल्ला मेट्रो ४५ सेकंदांत पार करणार आहे. हा बोगदा युरोस्टारच्या लंडन-पॅरिस कॉरिडॉरची भारतीय आवृत्ती आहे.

ममता बॅनर्जी बसल्या प्रेक्षकांसह खुर्चीवर

- हावडा रेल्वेस्थानकावर भाजप कार्यकर्त्यांच्या  घोषणाबाजीमुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिला. 

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यांनी प्रेक्षकांसह खुर्चीवर बसणे पसंत केले.

दु:ख दूर सारून मोदी कामात व्यस्त...

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांच्या अंत्यसंस्कारानंतर सुमारे दोन तासांतच आपले दु:ख दूर सारून निर्धारित कार्यक्रमांना व्हर्च्युअली हजेरी लावली. प. बंगालमधील पहिल्या ‘वंदे भारत ट्रेन’ला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘तुमची आई, आमची आई...देव तुम्हाला तुमचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे बळ देवो. मी तुम्हालाही थोडी विश्रांती घ्या,’ अशी विनंती केली. यावेळी मोदी यांनी वैयक्तिक कारणांमुळे कार्यक्रमाला प्रत्यक्षात येऊ शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.  

बंगालच्या जनतेच्या वतीने ममता यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मोदींनी शुक्रवारी बंगालमध्ये ७,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. यामध्ये कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाइनच्या जोका-तरातला टप्प्याचे उद्घाटन आणि राज्यातील चार रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. बंगालमधील ईशान्येकडील सर्वांत मोठ्या स्थानकांपैकी एक असलेल्या न्यू जलपाईगुडी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचा मोदींनी शुभारंभ केला. राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनअंतर्गत ९९० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात सीवरेज पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस