शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

पंतप्रधान मोदी आणि सुषमा स्वराजांचे लोकसभेत हार्दिक स्वागत

By admin | Updated: March 15, 2017 20:30 IST

उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी लोकसभेत जयश्रीराम, हरहर मोदी घरघर मोदी, भारत माता की जय घोषणा देत, बाके वाजवीत जोरदार स्वागत केले. किडनीच्या आजारपणानंतर दीर्घकाळाने सभागृहात परतलेल्या सुषमा स्वराज यांचे सर्वपक्षिय सदस्यांनी तितक्याच उत्साहाने स्वागत केले. निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान बुधवारी प्रथमच लोकसभेत येताच भाजपचे सारे सदस्य जागेवर उठून उभे राहिले. उत्तरप्रदेश व उत्तराखंडाच्या जोडीला मणिपूर आणि गोव्यातही भाजपचेच सरकार स्थापन होत असल्याने सत्ताधारी बाकांवर प्रचंड उत्साह संचारला होता. पंतप्रधानांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा संचार मंत्रालयाशी संबंधित प्रश्नोत्तरे सुरू होती. तथापि सत्ताधारी सदस्यांमधे अचानक पंतप्रधानांच्या स्वागताचा जोश संचारल्यामुळे काही क्षण कामकाज स्तब्ध झाले. सत्ताधारी सदस्यांच्या जोडीला बीजू जनता दलाचे जे. पांडाही बाके वाजवतांना दिसले तर टीआरएसच्या जितेंद्र रेड्डींनी पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाउन त्यांचे अभिनंदन केले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच साऱ्या सभागृहाने सुषमा स्वराजांचे हार्दिक स्वागत केले. स्वराजांचे स्वागत करतांना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दीर्घकाळानंतर सभागृहात तुमचा आवाज दुमदुमतो आहे ही आनंदाची बाब आहे. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. स्वागताचा स्वीकार करतांना सुषमा स्वराजांनी तमाम सदस्यांचे आभार मानले. भगवान कृष्णाची आपल्यावर कृपा असल्यामुळेच या आजारातून मी सुखरूप बाहेर आले असेही त्या म्हणाल्या.अमेरिकेत मूळचे भारतीय असलेल्या नागरीकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत केंद्र सरकार गप्प का बसले आहे? या आरोपाचे जोरदार खंडन करतांना सुषमा स्वराज म्हणाल्या, अमेरिकेत भारतीय मूळाच्या नागरिकांची सुरक्षितता हा केंद्र सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. अमेरिकेत ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबियांनीही सरकारवर असा आरोप केलेला नाही. भारत सरकार अमेरिकन सरकारशी सातत्याने संवाद साधून आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील भारतीय समुदाय आणि भारत सरकारच्या दूतावासाशी देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय नियमितपणे संपर्कात आहे. परदेशस्थ भारतीयांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार सतर्क असून आवश्यक ती सारी कार्यवाही सरकार करील, अशी ग्वाही स्वराज यांनी लोकसभेत दिली. गोवा आणि मणिपूरमधे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण दिले नाही. पक्षाची बाजूही ऐकली नाही. याचा निषेध करीत काँग्रेस सदस्य घोषणा देत वेलमधे आले. या गोंधळात राज्यसभेचे कामकाज तीनदा तहकूब झाल्यानंतर अंतत: दिवसभरासाठी तहकूब झाले.