साहित्य संमेलनासाठी पंतप्रधानांना आवतण
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
साहित्य संमेलनासाठी पंतप्रधानांना आवतण
साहित्य संमेलनासाठी पंतप्रधानांना आवतण
साहित्य संमेलनासाठी पंतप्रधानांना आवतणमुंबई : महाराष्ट्राची सीमा ओलांडून संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे होणार्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले तर ती मराठी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट ठरेल. त्यामुळेच घुमान येथील संमेलनाला पंतप्रधानांना निमंत्रण देण्याचा मनोदय असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले. त्यामुळे दिल्लीवारी करुन मोदींना विशेष निमंत्रण देण्याचा विचार असल्याचे देसडला यांनी सांगितले. यापूर्वी कर्हाड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते झाले होते. संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनावरील प्रकाशकांचा बहिष्कार मागे घेतला गेला असून आतापर्यंत २० प्रकाशकांसाठी प्रदर्शनातील दालनासाठी अर्ज नेले असल्याची माहिती भारत देसडला यांनी दिली.