शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मोदींना हटवून अमित शहांना बनायचे आहे पंतप्रधान - लालू प्रसाद यादव

By admin | Updated: October 8, 2015 10:59 IST

नरेंद्र मोदींना धक्का देऊन अमित शहांना 'पंतप्रधान'पदी विराजमान व्हायचे आहे, असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८ - भाजपाध्यक्ष अमित शहा पंतप्रधान बनण्यास आतूर झाले असून नरेंद्र मोदींना धक्का देऊन त्यांना 'पंतप्रधान'पदी विराजमान व्हायचे आहे, असा खळबळजनक आरोप राजदचे अधयक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असून बिहारमधील वातावरण तापू लागले आहे. महाआघाडी व रालोआचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे बाण सोडू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी आयोजित केलेल्या पत्रकार लालूंनी भाजपावर टीका केली.
नरेंद्र मोदींची खुर्ची खेचून त्यावर बसण्यासाठी अमित शहा आतूर झाले असून ते तशी व्यूहरचना करत असल्याचे लालूंनी म्हटले. गाईवरून सुरू असलेल्या वादाला लालूंनी आज पुन्हा हवा दिली. 'मी गाईची पूजा करतो, मोदींनी कधी शेण उचललं आहे का? आमच्यासाठी गाईचे शेण चंदनासमान आहे' असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले.
आरएसएस म्हणजे द्वेषाची फॅक्ट्री असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार निशाणा साधला. आरक्षणाबाबत मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यावर मोदींनी मौन का धारण केले आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मोदींना बिहारमधील पराभवाची चाहूल लागली आहे, भविष्यात महाआघाडी दिल्लीतील सत्ता पलटून टाकेल, हेही मोदींच्या लक्षात आले आहे. बिहार निवडणुकीदरम्यान भाजपा जी आश्वासने देत आहे ती लोकसभा निवडणुकीतील आश्वासनांप्रमाणेच अपूर्ण राहणार अशी टीका त्यांनी केली.