शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या पंतप्रधानांनीही पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलं होतं 5 हजार रुपयांचं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 09:42 IST

पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी भविष्यात ते पैसे परत करेल किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही.

ठळक मुद्दे पंजाब नॅशनल बँकेकडून गाडी घेण्यासाठी पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.1894 साली स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक नीरव मोदीने केलेल्या 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळयामुळे चर्चेत आहे. 

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी भविष्यात ते पैसे परत करेल किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही. पण याच पंजाब नॅशनल बँकेकडून भारताच्या एका पंतप्रधानांनी कर्ज घेतले होते. भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सुद्धा पंजाब नॅशनल बँकेकडून गाडी घेण्यासाठी पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. लाल बहादूर शास्त्री यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून या कर्जाची परतफेड केली होती. 

लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनी ही माहिती दिली. हे कर्ज का घ्यावे लागले त्याची आठवण सांगताना अनिल शास्त्री म्हणाले कि, आम्ही सेंट कोलंबो शाळेत होते. त्यावेळी आम्ही टांग्याने शाळेत जायचो. एकदा आम्ही शाळेत जाण्यासाठी सरकारी गाडी वापरली. पण नियमितपणे खासगी कामांसाठी सरकारी गाडी वापरायला माझ्या वडिलांची परवानगी नव्हती. त्यावेळी आपल्याकडे स्वत:ची गाडी असावी अशी कुटुंबियांची इच्छा होती. घरात गाडी घेण्याची मागणी सुरु होती. 

ते 1964 चे वर्ष होते. त्यावेळी शास्त्रीजींचे सहाय्यक व्ही.एस.वेंकटरामन यांनी चौकशी केल्यानंतर समजले कि, फियाट गाडीची किंमत 12 हजार रुपये आहे. त्यावेळी कुटुंबाकडे फक्त 7 हजार रुपये होते. शास्त्रीजींनी पंजाब नॅशनल बँकेकडे 5 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला.  लगेच त्याचदिवशी कर्ज मंजूर झाल्याची आठवण अनिल शास्त्री यांनी सांगितली. 

गाडी घेतल्यानंतर दोनच वर्षांनी 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद येथे परिषदेसाठी गेलेल्या शास्त्रीजींचे अचानक निधन झाले. त्यावेळी आम्ही घेतलेल्या पाच हजार रुपयाच्या कर्जाची परतफेड झाली नव्हती. माझ्या आईने तिला मिळणाऱ्या पेन्शनमधून हे कर्ज फेडले असे अनिल यांनी सांगितले. क्रिम रंगाची ही कार फियाटचे 1964 सालचे मॉडेल आहे. DLE 6 असा या गाडीचा नंबर होता. मोतीलाल नेहरु मार्गावर असलेल्या लाल बहादूर शास्त्री स्मारकात आता ही कार ठेवण्यात आली आहे. 1894 साली स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक नीरव मोदीने केलेल्या 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळयामुळे चर्चेत आहे.  

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी