शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

‘गुजरातच्या लोहपुरुषा’वर गर्व

By admin | Updated: May 19, 2014 03:28 IST

मोदी यांनी लाखो मैलांचा प्रवास करीत भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशव्यापी यश प्राप्त करून दिले आहे.

नंदू पुरोहित, अहमदाबाद-  मोदी यांनी लाखो मैलांचा प्रवास करीत भाजपाच्या नेतृत्वातील राष्टÑीय लोकशाही आघाडीला देशव्यापी यश प्राप्त करून दिले आहे. एका प्रचार सभेत मोदी म्हणाले होते, ‘‘गुजरातसारखा विकास करण्यासाठी ५६ इंची छाती असावी लागते.’’ त्यांचे हेच वाक्य अख्ख्या अहमदाबादेत लोकप्रिय झाले आहे. प्रत्येकाच्या तोंडी आज हेच वाक्य आहे. शनिवारी सकाळी अहमदाबादेत पोहोचल्यानंतर विमानतळावरून बाहेर पडल्यावर रिक्षावाल्यासोबत गप्पा सुरू झाल्या. राजूभाई गाला नावाच्या या रिक्षावाल्याजवळ मोदींचा विषय काढताच तो मोठ्या उत्साहात सांगू लागला, ‘‘आता तर देशावर गुजराती माणसाचे राज्य आहे.’’ यामुळे गुजरातच्या विकासावर परिणाम होईल असे तुम्हाला वाटत नाही काय? या प्रश्नावर त्याचे उत्तर होते, ‘‘तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी आप्तेष्टांची साथ सोडावीच लागते. त्यात नरेंद्रभाई तर देशाची सेवा करण्यासाठी गेले आहेत.’’ तेथून हॉटेलपर्यंतच्या प्रवासात राजूभार्इंनी गुजरातमध्ये विकासाची गंगा कशी वाहात आहे याची गाथाच सांगितली. अगदी मोदींच्या शैलीत. मोदींची वक्तव्ये आणि त्यांच्या भाषणांनी येथील लोकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. कालुपूर रेल्वे स्टेशनजवळ चहाची टपरी चालविणारे परेश ढोलकिया यांचीही भावना याहून वेगळी नव्हती. त्याच्यासोबत चहावाल्या मोदींवर चर्चेचा फड चांगलाच रंगला होता. यापूर्वी लोकांचा चहावाल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नव्हता. पण मोदींमुळे चित्र पालटले. लोक आमच्याकडे आदराने बघायला लागले. आमच्यासारख्या सर्वसामान्यांना केवळ मोदींमुळे हा सन्मान प्राप्त झाला, अशी भावना त्याने व्यक्त केली. शहरात मार्गविस्तारीकरणामुळे ठिकठिकाणी घरांच्या इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसतात. परंतु लोकांची याबाबत काही तक्रार नाही. या कामामुळेच येथे मोठ्या दुकानांचा व्यवसाय वाढला आणि आजूबाजूला कामानिमित्त येणार्‍यांची संख्याही वाढली. स्वाभाविकच चहाची टपरी चालविणार्‍यांनाही याचा फायदा झाला. मग आम्ही तक्रार का करायची, असा त्याचा सवाल होता. परंतु कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी पोहोचलेल्या रजनीबेन रावेल यांनी जे सांगितले ते धक्कादायकच होते. मोदी देशाचे पंतप्रधान होणार याचा त्यांना आनंद होता. परंतु त्यांनी देशाला दाखविलेले स्वप्न पाच वर्षांत पूर्ण केले नाहीतर मात्र जनता त्यांना धडा शिकवेल. चुका झाल्यावरही समजून घेऊन क्षमा करायला देश म्हणजे काही गुजरात नाही, असे त्यांचे म्हणणे होते. (विशेष प्रतिनिधी)