शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Nasal Covid vaccine Price: 'भारत बायोटेक'कडून कोरोनाच्या 'नेझल लसी'ची किंमत जाहीर, जाणून घ्या किती येईल खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:11 IST

intranasal Covid vaccine price: भारत बायोटेकच्या कोरोना विरोधातील नेझल लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- 

भारत बायोटेकच्या कोरोना विरोधातील नेझल लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे.  कोरोना विरोधातील लढ्यात नेझल लसीला गेल्याच आठवड्यात वापराची परवानगी देण्यात आली आहे. या लसीची किंमत ८०० रुपये इतकी असणार असून त्यावर खासगी रुग्णालय ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. 

जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना भारतानं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारने गेल्या शुक्रवारी याच तयारी अंतर्गत कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ही लस बूस्टर म्हणून वापरली जाईल आणि खाजगी रुग्णालयांमध्ये प्रथम उपलब्ध होईल.

नेझल लसीसाठी कसं अप्लाय कराल?भारत बायोटेकची नेझल लस आजपासून CoWIN अॅपवर उपलब्ध होईल. यासंदर्भात CoWIN प्लॅटफॉर्ममध्येही बदल करण्यात येणार आहेत. देशातील कोणताही व्यक्ती फक्त CoWIN अकाऊंटमध्ये साइन इन करू शकतो आणि लस स्लॉटसाठी अप्लाय करू शकतो. ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल आणि आजपासून कोविड-19 लसीकरण प्रोग्राममध्ये समाविष्ट केली जाईल.

कोण घेऊ शकतं ही लस?१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना iNCOVACC नेझल लस मिळू शकते जी भारत सरकारनं मंजूर केली आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून वापरली जात आहे. नेझल लसीचे इंजेक्शनच्या तुलनेत बरेच फायदे आहेत. नेझल लसीची साठवण, वितरण आणि कमी कचरा निर्मिती होते. तसंच नाकावाटे दिली जाणारी लस विषाणूच्या एन्ट्री पॉइंट म्हणजेच नाक आणि  श्वसनमार्गाला संरक्षण प्रदान करते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस