शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'नीट'संदर्भातील वटहुकूमावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांना दिलासा

By admin | Updated: May 24, 2016 11:58 IST

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) वटहुकूमावर मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ -  वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा वर्षभराने पुढे ढकलण्याच्या (नीट) वटहुकूमावर मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश राज्यांच्या सीईटीनुसारच होणार आहे. खासगी वैद्यकीय कॉलेजमधील सरकारी कोट्यातील जागा सीईटीमार्फतच भरल्या जाणार असून इतर जागा व 'डीम्ड' विद्यापीठातील प्रवेश हे 'नीट'मार्फतच होणार आहेत. 
विविध राज्यांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने देशभरात या वर्षापासूनच ‘नीट’ लागू करण्याचा आदेश दिला असताना केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत वटहुकुमाचा पर्याय निवडला. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी संबंधित वटहुकुमाला मंजुरी दिली होती. त्यामुळे न्यायालयीन आदेशावर कुरघोडी केली झाली असती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी आरोग्य मंत्रालयाला त्यामागचे कारण विचारले असून वटहुकूमाबाबत राष्ट्रपती भवनातील तज्ज्ञांचे मतही मागवले होते. राष्ट्रपतींनी अध्यादेशाबाबत आणखी माहिती आणि स्पष्टीकरण मागितले होते. अखेर आज सकाळी चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी राष्ट्रपतींनी नीटच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. देशाच्या महाधिवक्त्यांनी राष्ट्रपतींना नीटबाबत कायदेशीर बाजू समजावून सांगितली आहे.  
दरम्यान आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन ‘नीट’बाबत राज्यांच्या विरोधाची कारणे व अध्यादेशाची परिहार्यता याची माहिती त्यांना दिली होती. 
'नीट’अंतर्गत दुसरी परीक्षा २४ जुलै रोजी होणार आहे. वटहुकूम जारी झाल्यानंतर यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्यमंडळांची प्रवेश परीक्षा दिली आहे त्यांना या दुसऱ्या परीक्षेस बसण्याची गरज नाही, असे विविध सरकारांनी यापूर्वी जाहीर केले होते.