शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:03 IST

गृहमंत्रालयाला विनाकारण उपराज्यपालांची पत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याचे निमित्त साधून केंद्रातील भाजप सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याच्या तयारीत असल्याची शंका ‘आम आदमी पार्टी’ सरकारचे मंत्री आणि नेते व्यक्त करीत आहेत.

केजरीवाल सरकारविरोधात मोठे कारस्थान रचले जात असून, येणाऱ्या काही दिवसांत केंद्रातील भाजप सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असल्याचा आरोप दिल्लीच्या अर्थ तसेच शिक्षणमंत्री आतिशी सिंह यांनी केला. सरकारच्या कामकाजाविषयी कारण नसताना उपराज्यपाल सक्सेना गृह मंत्रालयाला पत्रे लिहीत आहेत. अधिकारी बैठकींना येत नाहीयेत.  या घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चाललेल्या वाटचालीच्या निदर्शक असल्याचा दावा आतिशी सिंह यांनी केला.

पक्षप्रचारासाठी सिसोदिया यांना हवा जामीनnगेल्या चौदा महिन्यांपासून मद्य धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी अंतरिम जामिनासाठी राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. nसिसोदिया यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने खटले भरले असून, याचिकेवर २० एप्रिल रोजी सुनावणी होईल. 

राज्यसभा खासदार नेमके गेले कुठे? जोरदार चर्चापंजाब आणि दिल्ली मिळून आम आदमी पार्टीचे राज्यसभेत १० खासदार आहेत. त्यापैकी नुकतेच तिहार तुरुंगातून जामिनावर सुटलेले संजय सिंह वगळता राज्यसभेतील पक्षाचे अन्य खासदार केजरीवाल यांच्या अटकेनंतर फारसे दिसलेले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, ‘आप’चे राज्यसभा सदस्य पूर्वीही पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नव्हते, असे सांगून त्यांच्या संबंधात सुरू असलेल्या अटकळी सौरभ भारद्वाज यांनी फेटाळून लावल्या.

....म्हणून त्यांची अस्वस्थता वाढलीकितीही जोर लावला तरीही दिल्लीत निवडणूक जिंकून सत्तेत येऊ शकत नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. वीज, पाणी, शाळा, आरोग्य सुविधा, महिलांना मोफत वाहतूक तसेच दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घोषणेमुळे भाजपची अस्वस्थता वाढली आहे. या सर्व योजना रोखण्यासाठी  सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप