शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

राष्ट्रपतींनी टोचले गोंधळबाजांचे कान

By admin | Updated: January 20, 2015 02:41 IST

काँग्रेससाठी सोमवार दुहेरी अडचणींचा ठरला. संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीररीत्या फटकारले.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीकाँग्रेससाठी सोमवार दुहेरी अडचणींचा ठरला. संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीररीत्या फटकारले. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत काँग्रेसला हादरा दिला आहे.आर्थिक सुधारणांचा रेटा दाखवणाऱ्या विविध विधेयकांच्या संमतीसाठी गत आठ महिन्यांत आठ वटहुकूम काढणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी अप्रत्यक्षरीत्या ताकीद दिली़ प्रत्येक विधेयकाच्या संमतीसाठी वटहुकुमाचा पर्याय स्वीकारणे योग्य नसल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले़केंद्रीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले़ या वेळी वटहुकुमाच्या मुद्द्यावर केवळ सरकारच नाही, तर विरोधकांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या़ संसदेतील गोंधळ आणि वटहुुकुमाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल राष्ट्रपती म्हणाले की, राज्यघटनेनुसार विधेयकाच्या संमतीसाठी वटहुकुमाच्या पर्यायाचावापर अत्यंत अपवादात्मक स्थितीत होणे अपेक्षित आहे़ सरसकट सर्वच विधेयकासाठी वटहुकूम आणणे योग्य नाही़कार्यपालिकेद्वारे सर्रास वटहुकूम जारी करण्यासंदर्भात विचारले असता, मी राजकीय पक्षांशी बोललो आहे़ एकत्र येऊन सामंजस्याने तोडगा काढावा, असे मी त्यांना सुचवले आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़अल्पसंख्यक असलेल्या गोंधळकऱ्यांकडून संयमी बहुसंख्यक घेरले जाऊ नये, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.संसदेत वारंवार अडथळे आणत कामकाज रोखण्याच्या वृत्तींवर राष्ट्रपतींनी केलेली टीका काँग्रेसला जास्त बोचणारी आहे. राष्ट्रपती एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तीन दशकांनंतर देशातील मतदारांनी एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत स्थिर सरकारसाठी आणि जनतेच्या आशाआकांक्षाच्या पूर्ततेसाठी कौल दिला असल्याचे नमूद केले. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी कामकाजाचा खोळंबा चालविल्याबद्दल राष्ट्रपतींनी नापसंती दर्शविल्याचे स्पष्टच दिसून येते. पहिल्यांदाच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जे घडले त्यावर राष्ट्रपती बोलले आहेत. राज्यसभेचे कामकाज ठप्प पडल्याची पार्श्वभूमी त्यामागे होती.शहांच्या धोरणाचा भाजपला लाभच्भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि अगदी जम्मू-काश्मीरमध्येही पक्षाची दारे खुली करीत अन्य पक्षांच्या असंतुष्ट नेत्यांना सामावून घेण्याचे धोरण अवलंबले. च्भाजपने ही राज्ये काबीज करीत पक्षाला लाभच झाल्याचे दाखवून दिले. गेली १५ वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपला दिल्लीत सत्तेवर आणण्यासाठी शहा यांनी हेच धोरण कायम ठेवले आहे.व्यवहार्य तोडगा शोधणे ही सर्वांची जबाबदारी वटहुकूम आणण्याचा मार्ग टाळण्यासाठी एखादा व्यवहार्य तोडगा शोधणे ही संपूर्ण संसदीय सदस्यांची जबाबदारी आहे़ विरोधकांजवळ संख्याबळ असेल तर ते विरोध करू शकतात. पण अंतिमत: जबाबदारी ही लोकसभेत प्रत्यक्ष निवडून गेलेले व राज्यांतून राज्यसभेवर गेलेले सदस्य यांची असते. - प्रणव मुखर्जी, राष्ट्रपतीराहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल नाराजीबीरेंदरसिंग यांनी ४० वर्षांनंतर काँग्रेसला रामराम ठोकण्याचे कारण राहुल गांधी यांची कार्यशैली हेच सांगण्यात येते. त्यातच कृष्णा तीरथ यांच्या राजीनाम्याने सोमवारी दुपारी काँग्रेसला अचानक हादरा बसला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांना केंद्रात मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात येत असल्यानेच कुंपणावरील नेत्यांनी ही संधी शोधल्याचे मानले जाते.राष्ट्रपतींनी विरोधी पक्षांवर केलेल्या टीकेमुळे साहजिकच भाजपाच्या नेतृत्वाला आनंद झाला आहे. दिल्ली काँग्रेसमधील आघाडीच्या नेत्या दलित चेहरा मानल्या जाणाऱ्या कृष्णा तीरथ यांच्या प्रवेशामुळे भाजपाचा आनंद द्विगुणित झाला.तीरथ यांचा भाजपाशी घरोबाच्तीरथ यांनी अचानक काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपाशी घरठाव करताना कुणावरही टीका करण्याचे टाळले, मात्र काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या काही निर्णयांवर त्या नाराज होत्या असे समजते. च्काँग्रेसने पक्षाची पडझड रोखण्यासाठी हालचाली चालविल्या असल्या तरी काँग्रेसचे आणखी काही नेते बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे.